Whatsapp Marketing Marathi | व्हॉट्स ॲप मार्केटिंग मराठी

व्हॉट्स ॲप मार्केटींग मराठी  ||  Whatsapp Marketing Marathi.

 

whatsapp marketing

 

मित्रांनो आजकाल what’s app  चा वापर प्रत्येक जण करत आहे. प्रत्येकाच्या फोन मध्ये Whatsapp आहे. मित्रांनो याचा वापर फक्त चॅटिंग पुरता मर्यादित राहिलेला नाही याचा वापर आपण मार्केटिंग साठी करणार आहे यालाच Whatsapp Marketing Marathi  असे म्हणतात.

टेक्स्ट मेसेज
व्हॉट्स अँप वर वस्तू आगर सेवा तसेच प्रॉडक्ट च्या वापराबद्दल माहिती ग्राहकांना शेअर करता येते.Whatsapp वरचा एक मेसेज ४ हजार शब्दांपर्यंत ठेवता येतो. जेव्हापासून व्हॉट्स अँप वापरण्यात येत आहे तेव्हा पासून खूप गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत .

फोटो –
खरेतर एक फोटो हा हजारो शब्दांची संपूर्ण कथा सांगत असतो। एखाद्या वेळेस मजकुराकडे दुर्लक्ष केले जाते पण फोटो कडे दुर्लक्ष केले जात नाही कारण फोटो मधून आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती कळते. एक चांगला फोटो ग्राहकांना हमखास आकर्षित करतो. शिवाय तो शेअर सुद्धा केला जातो. प्रॉडक्ट चा फोटो कस्टमर्स ना खरेदीसाठी प्रवृत्त करत असतो त्यामुळे फोटो शेअरिंग चे प्रमाण सुद्धा वाढत आहे. Whatsappवर प्रॉडक्ट चे फोटोस टाकून आपला वयवसाय वाढण्यास मदत होते.

विडिओ –
Whatsapp Marketing करताना विडिओ चा जास्त वापर केला जातो.
तुमचे एखादे प्रॉडक्ट आहे आणि त्या बद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे तर तुम्ही विडिओ च्या माध्यमातून देऊ शकता. प्रॉडक्ट कस वापरायचे ,त्याचा वापर कसा करायचा तसेच प्रॉडक्ट च्या माहितीचे व्हिडिओस तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा पाठवू शकता आणि ग्राहकांना ते व्हिडिओस आवडले तर ते प्रॉडक्ट तुमच्या कडून नक्की खरेदी करतील.

तसेच प्रमोशनसाठी सुद्धा विडिओ चा वापर केला जातो. प्रॉडक्ट चे चांगले व्हिडिओस बनवून ते अधिक अधिक लोकांना शेअर करायचे त्याबद्दल माहिती द्यायची आणि ग्राहकांना आवडले तर ते नक्कीच खरेदी करतील अशा पद्धतीने Whatsapp Marketing साठी खूप फायद्याचे ठरते.

ऑडिओ –
वयवसायाशी संबंधित रेकॉर्ड केलेले ऑडिओ मेसेज हजारो ग्राहकांपर्यन्त थेट पोहोचवणे याद्वारे शक्य होतात ,तसेच कंपनी मध्ये कामगार लोकांना सूचना देण्यासाठी ग्रुप मध्ये ऑडिओ मेसेज चा वापर केला जातो तसेच ऑडिओ मेसेज कडे शक्यतो कोणीच दुर्लक्ष करत नाही.

लोकेशन –
मित्रांनो व्हॉट्स अँप मध्ये लोकेशन हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुमची कंपनी, तुमचा वयवसाय , तुमचे दुकान तुमच्या ग्राहकांना समजण्यासाठी या प्लॅटफॉर्म चा वापर केला जातो , जर तुमच्या ग्राहकांना तुमच्या कंपनीचं ठिकण माहिती नसल्यास तुम्ही व्हॉट्स अँप मध्ये जाऊन तुमच्या कंपनीचे लोकेशन पाठवू शकता , मित्रांनो या प्लँटफॉर्म मुळे अनेक लोकांना कोणतेही ठिकाण सापडण्यास खूप मदत होते.

बिझनेस कार्ड किंवा कॉन्टॅक्ट – बिझनेस कार्ड डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्याचा हा उत्तम पर्याय आहे यातून ग्राहकांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जाता.

whatsapp marketing

व्हॉट्स अँप बद्दल अजून जाणून घेऊया-

  1.  व्हॉट्सॲप चा वापर 109 देशात.
  2. व्हॉट्स ॲप वापरणारे 70 टक्के लोक नियमित वापरतात.
  3. व्हॉट्स ॲप 53 भाषांमध्ये कार्यरत.
  4. 175 दशलक्ष लोक हे रोज स्टेटस अपडेट चा वापर करतात.
  5. दररोज 100 दशलक्ष व्हॉइस कॉल तर 55 दशलक्ष लोकांकडून व्हिडिओ कॉल केले जातात.
  6. व्हॉट्स ॲप मेसेज पैकी 90 टक्के मेसेज हे उघडले आणि पाहिले जातात.
  7.   नेल्सन फेसबुक मेसेजिंग सर्विस नुसार 67% मोबाइल युजर्स चॅट व्यवसायिक संबंधित मेसेजच्या देवाणघेवाणीसाठी तसेच कंपन्या थेट ग्राहकांशी थेट व्हॉट्स ॲप वापर करतात.
  8. व्हॉट्स ॲपकडून 256 युजर्स चा ग्रुप तयार करण्याची मुभा मिळते. ही व्यवसायाच्या दृष्टीने मोठी संधी असते की एक वेळी मेसेज थेट अडीचशे पर्यंत पोहोचवता येतो.
  9. Whatsapp Marketing द्वारे व्यवसायिक जाहिराती बातम्यांचे काही क्षणात प्रमोशन होते यावर ब्राऊचर  व्हिडीओ फोटो लिंक्स ऑडिओ अशी व्यवसायाशी निगडीत मल्टीमीडिया कन्टेन्ट शेअर करण्याची मुभा मिळते.
  10. 2017 च्या आकडेवाडी आकडेवारीनुसार व्हॉट्सऍप ची लोकसंख्या ही 1200 दशलक्षाहून अधिक होती.

Whatsapp  चे फायदे काय आहेत जाणून घेऊया-

1)व्हाट्स अपवरच्या चॅट व्हिडिओ कॉल या सुविधांमुळे ग्राहकांशी थेट संवाद साधून तक्रारी तसेच सेवेबाबतच्या समस्या जाणून त्यांचे निरसन करता येते. तसेच ग्राहकांशी व्यवसायिक नाते अधिक दृढ करता येते.

2)व्हॉट्स वेब चा वापर करून डेस्कटॉप लॅपटॉप वरूनही व्हॉट्सअप चा वापर करता येतो .ग्राहकांशी सुलभ पद्धतीने गतीने संवाद तसेच वस्तू अगर सेवेबाबत शेअरिंग करता येते.

3) व्हॉट्स ॲप स्टेटस हा स्वतःला सादर करण्याचा एक अलीकडचा सर्वात लोकप्रिय ट्रेण्ड आहे याद्वारे उत्पादित वस्तू अगर सेवेविषयी ची जाहिरात लक्षवेधी आणि प्रभावी ठरते.

बिझनेस व्हॉट्स अँप-

whatsapp marketing

फेसबुक ची मालकी असलेल्या व्हाट्सअप ने लहान-मोठे व्यवसाय उद्योग यांना व्यवसायाशी संबंधित माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी स्वतंत्र “बिझनेस व्हॉट्सॲप” बाजारात आणले आहे. अन्य व्यावसायिक तसेच ग्राहकांशी संपर्क करत राहण्यासाठी नवीन “बिझनेस व्हॉट्सॲप” उपयुक्त ठरत आहे. याचा वापर हा नेहमी व्हॉट्स ॲपप्रमाणेच करता येतो .फोन मधील कॉन्टॅक्ट मधील लोकांना बिझनेस व्हाट्सअप मध्ये घेता येते मात्र त्यांच्याकडे ही बिझनेस व्हॉट्सऍप असणे गरजेचे आहे.या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे क्विक रिप्लाय द्वारे ग्राहकांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तर देता येते शिवाय यामध्ये टेम्प्लेट तयार करून ग्राहकांना शुभेच्छा धन्यवाद पाठवता येतात.

आज सर्वच क्षेत्रात प्राधान्याने व्हाट्सअप सेवेचा वापर होत आहे ग्राहकांशी थेट संपर्कात राहून वस्तू अगर सेवेची जाहिरात करून त्यांना आकर्षित केले जाते वस्तू अगर सेवेचे महत्त्व व उपयुक्तता पटवून दिली जाते यासाठी फोटो ऑडिओ-व्हिडिओ चा वापर केला जातो.

WhatsApp Business ॲप वापरण्यास सुरुवात कशी करावी

१. Google play store आणि Apple store व्हॉट्सॲप बिसनेस डाउनलोड करा. दोन्ही स्टोरे  अँप वर फ्री आहे . डाउनलोड केल्या      नंतर तुमच्या फोन च्या होम स्क्रीन वरील WhatsApp Business आयकॉन वर क्लिक करा.

२. WhatsApp Business वर आल्यानंतर त्यावरील सेवाशर्ती accept  करा. आणि पुढे टॅप करा.

३. नोंदणी करा – तुमचा कंट्री कोड जोडण्यासाठी ड्रॉप डाउन लिस्ट मधून देश निवडा. नंतर तुमचा फोन नंबर एंटर क्राऊन सबमिट करा त्यानंतर तुमच्या फोन वर otp येईल तो सबमिट करा.

४. तुमच्या फोने मधील कॉन्टॅक्ट आणि फोटो ना ऍक्सेस करण्याची अनुमती द्या.

५. तुमच्या बिसनेस चे नाव भर, कॅटेगरी निवडा आणि आणि प्रोफाइल फोटो लावा.

६. तुमचे बिसनेस प्रोफाइल तयार करा. तुम्ही तुमच्या बिसनेस चा पत्ता , कामाचे तास ,बिझनेसबद्दल माहिती आणि इतर महत्त्वपूर्ण  माहिती भरा.

७. तुमचे बिसनेस प्रोफाइल आता तयार झाले आहे.

WhatsApp Business टूल्स एक्सप्लोअर करा.

WhatsApp Business मध्ये तुम्हाला तुमचा बिसनेस उत्तम पद्धतीने चालवण्यासाठी अनेक चांगले टूल्स आहेत. हे टूल्स माहित करण्यासाठी तुम्ही तुमच्या WhatsApp Business च्या चाट स्क्रीन वर जा. सेटिंग वर टॅप करा नंतर बिसनेस टूल्स वर टॅप करा.

  • कॅटलॉग – तुमच्या Business अकाउंट वर तुमचे प्रॉडक्ट आणि सर्विस दाखवा आणि त्याची संपूर्ण माहिती द्या.
  • शॉर्ट लिंक – नवीन ग्राहकांना तुमच्या Business ला जोडण्यासाठी शॉर्ट लिंक चा वापर करा. मॅसेज च्या मदती ने शॉर्ट लिंक शेअर करा. नवीन ग्राहकांना जोडेल .
  • मेसेजिंग टूल्स – आपल्या Business बद्दल महत्त्वाची माहिती आधीच तयार करण्यासाठी WhatsApp मेसेजिंग टेम्प्लेट्सचा वापर करा. एकदा नवीन ग्राहक जोडला गेला तर ती माहिती ऍटोमॅटिक त्याला सेंड होईल.काही वेळेस तुम्हला उत्तर देण्यास वेळ नसेल तर तो हि मेसेज सेट करा.
  • लेबल – नवीन ग्राहक आणि पेंडिंग ऑर्डर्स सारख्या कॅटेगिरीज मध्ये तुमची गाहकांसोबत झालेली चाट क्रमाने लावा.

तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी Whatsapp marketing का वापरावे?

Whatsapp मेसेज करण्यासाठी सर्वात जास्त लोकप्रिय अँप आहे. तसेच मार्केटिंग साठी पण हा प्लॅटफॉर्म उत्तम आहे. whatsapp मार्केटिंगमुळे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट आणि सर्विस सहजरित्या ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतो. कारण whatsapp वापरणारे दररोज तपासात असतातच.त्यामुळे तुम्ही ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देऊ शकता आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकता . आणि एकदा ग्राहकांना विश्वास बसला तर आपली विक्री हि वाढते.

१. ग्राहकांशी संबंध –

जगातील सगळ्याच लोकांकडे Whatsapp आहे. त्याचाच फायदा आपल्याला मार्केटिंग साठी करून घ्यायचा आहे. ग्राहकांना आपल्या प्रॉडक्ट चे खरे फोटो पाठून त्यांचा विश्वास संपादन करून शकता. त्यांना वेगवेगळ्या ऑफर देऊ शकता. तुम्ही ग्राहकांना वैयक्तिकरित्या मॅसेज करून त्यांच्याशी जोडलेले राहू शकता. आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्विस बाबतीत ग्राहकांचे जे प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपण वैयक्तिकरित्या मॅसेज करून दूर करू शकता त्यामुळे ग्राहकांचा online खरेदीचा आत्मविश्वास वाढतो.

२.उत्तम विक्री –

Whatsapp marketing हे तुमच्या बिसनेस साठी सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही जर तुमच्या बिसनेस ची वेबसाईट ओपन केली असेल किंवा social मीडिया वर प्रोफिल बनवले असेल तर तिथे तुम्ही तुमचा Whatsapp नंबर दिला असेल तर तुमच्या विक्री वरती ३०% चांगला परिणाम होतो. कारण असे केल्याने ग्राहक आपल्याशी डायरेक्ट जोडले जातात. तुमच्या बिसनेसच्या विक्रीच्या वाढीसाठी Whatsapp हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे.

३.मार्केटिंग बजेट –

साधारणतः एक व्यक्ती दिवसातून ३० वेळा तरी Whatsapp तपासत असतो. त्यामुळे मार्केटिंगसाठी Whatsapp हा एक चांगला आणि परवडणारा प्लॅटफॉर्म आहे. लहान बिसनेस करणाऱ्यासाठी मार्केटिंगसाठी हा प्लॅटफॉर्म परवडणारा आहे. त्यामुळे त्यांच्या बिसनेस ग्रोथसाठी Whatsapp हे मदत करते. ग्राहकांपर्यंत लवकर पोहचण्यास मदत करते आणि तेही कमी खर्चमध्ये .

Whatsapp मार्केटिंगसाठी स्ट्रॅटेजि | Whatsapp Marketing Strategy

तुमची Whatsapp मार्केटिंग स्ट्रॅटजि तयार करण्यासाठी आणि त्याच चांगला परिणाम मिळवण्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे आपण पाहू.

१. तुमचे उद्दिष्टे ( Goals ) निश्चित करा –

तुमची Whatsapp मार्केटिंग स्ट्रॅटजि तयार करण्याआधी तुमची उद्दिष्टे निश्चित करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या Whatsapp मार्केटिंग स्ट्रॅटजिडोबतच तुम्ही तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

२. तुमचे ग्राहकवर्ग ठरवा –

आपले प्रॉडक्ट आणि सर्विस ला कोणता ग्राहक वर्ग जास्त आकर्षित होईल याचा रिसर्च करा. त्या ग्राहक वर्गाच्या requirment काय आहे हे लक्षात घ्या. त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्या नंतर आपले प्रॉडक्ट आणि सर्विस बद्दल सविस्तर माहिती देऊन ते त्यांच्या साठी किती उपयोगाचं आहे याची त्यांना जाणीव करून द्या.त्यासाठी त्यांना ऑफर्स द्या.

३. Whatsapp Business अँपवर प्रोफिल बनवा –

लहान मोठ्या बिसनेस साठी Whatsapp ने ग्राहकांपर्यंत पोहच्यण्यासाठी अँप लॉन्च केलं आहे ते म्हणजे Whatsapp Business . ह्या अँप मध्ये काही चांगले ऑपशन्स आहे जसे कि तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विस ची माहिती त्यात भरू शकता. तुमच्या प्रॉडक्ट चे फोटो त्यात टाकू शकता. तुमची website बद्दल माहिती देऊ शकता. त्याच बरोबर ग्राहक तुमच्याशी डायरेक्ट जोडले जातात त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हला लगेच देता येऊ शकतात.

४. ब्रँड व्यक्तिमत्तव तयार करा – 

लोक हे संवाद साधण्यासाठी प्राधान्य देतात व्यवसाय नाही. म्हणून तुम्ही तुमचे ब्रँड व्यक्तिमत्तव तयार करणे गरजेचे आहे. ब्रँड व्यक्तिमत्तव हे तुमच्यातील गुणधर्म , मूल्य आणि वृत्ती दर्शवते. आणि ह्याची तुम्हला यशस्वी Whatsapp marketing साठी खूप मदत होते.

५. ग्राहकांना उत्तम सेवा द्या –

जास्तीतजास्त ग्राहक हे ब्रँड चा सपोर्ट मिळण्यासाठी मेसॅजिग अँप चा वापर करण्यास प्राधान्य देतात. कारण त्यांना त्यामुळे लवकर प्रतिसाद मिळतो. आणि ते काम Whatsapp खूप चांगल्या पद्धतीने करत. कारण ५० % ग्राहकांना त्वरित मदत मिळण्याची अपेक्षा असते आणि ती जर आपण जलद गती ने पूर्ण केली तर ग्राहकांचा आपल्यावर विश्वास बसतो.

सारांश

मित्रांनो आजकालचे युग हे पूर्ण डिजिटल युग आहे। संपूर्ण जग हे फास्ट होत चालले आहे। आजच्या काळात स्पर्धा खूप वाढली आहे। मार्केटिंग च्या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे , आपण पहिले कि Whatsapp चा आपल्याला खूप फायदा होत आहे। काही क्षणात आपण अनेक लोकांपर्यँत अगदी सहज पोहोचत आहे। लहान-मोठे उद्योग तसेच काही स्टार्ट अप्स यांना Whatsapp चा खूप फायदा होत आहे। Whatsapp मुळे बचत गट , घरगुती वयवसाय यांना खूप चांगला फायदा होत आहे.

FAQ OF WHATS APP MARKETING – 

 1 – तुम्हाला व्हाट्स अँप मार्केटिंग साठी किती रुपये लागतील ? || How Much Does Whats app Marketing Cost ?

मित्रांनो तुमच्याकडे जर कस्टमर चा डेटा असेल आणि तुमच्याकडे चांगले कॉन्टॅक्ट असतील तर तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाही.जर तुमच्याकडे कस्टमर डेटा बेस नसेल तर तुम्ही तो सोशल मीडिया वरून मिळवू शकता जसे कि फेसबुक वर खूप ग्रुप्स असतात या ग्रुप्स तर्फे तुम्हाला डेटा बेस नक्की मिळू शकतो.

2 – तुम्ही व्हॉट्स अँप वर जाहिरात करू शकता का ? || Can You Advertise With Whats app ?

मित्रांनो तुम्ही व्हॉट्स अँप वर तुमच्या प्रॉडक्ट ची जाहिरात करू शकता. तुम्हाला एक चांगली ऍड बनवावी लागेल ती तुमच्या व्हॉट्स अँप स्टेट्स ला पोस्ट करू शकता तसेच तुमच्या व्हॉट्स अँप मधील कॉन्टॅक्ट मध्ये लोकांना ती पोस्ट शेअर करू शकता.

3 – व्हॉट्स अँप हे मार्केटिंग साठी खूप शक्तिशाली आहे कसे ते जाणून घेऊया ? || How Powerfull Is Whats app Marketing ?

काही सेकंद मध्ये हजारो लोकांपर्यन्त फोटो , विडिओ , मेसेज आपण पाठवू शकतो. वस्तू विषयी संपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे आपण शेअर करू शकतो।Whatsapp चा फायदा हा छोट्या मोठ्या वयवसायांना होत आहे. Whatsappवरून कार्यक्रमाच्या ऑर्डर्स देखील मिळत आहे। बचत गट , किराणा माल यांना खूप चांगला फायदा होत आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला काही सांगायचे असल्यास कमेंट बॉक्स नक्की सांगा.

मिञांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात पैशांचे नियोजन कसे करता ?

Money Management Marathi | पैशांचे नियोजन मराठी

How to make money from Instagram in Marathi | इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?

How to Earn Money from Facebook in Marathi | फेसबुक वरून पैसे कसे कमवायचे

Share Market In Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती

1 thought on “Whatsapp Marketing Marathi | व्हॉट्स ॲप मार्केटिंग मराठी”

Leave a Comment