वेळेचे महत्त्व || Time Importance .
मित्रांनो आज आपल्या देशात खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती आहे कि त्यांनी वेळेचे महत्त्व जाणून त्याचा योग्य तो उपयोग केला आहे आणि त्यामुळे ते आज यशाच्या शिखरावर आहेत. आणि एवढे यश मिळूनही आजही ते वेळेला खूप म्हणजे खूप महत्त्व देतात. त्यामुळे आपण नक्कीच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आजकाल च्या पिढीचा बराचवेळ हा timepass करण्यात जातो. त्यामुळे आपल्या जीवनात Time Importance किती आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.
मित्रानो कोणतेही काम हे वेळेतच पूर्ण करा. मित्रांनो आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळेल पण गेलेली वेळ मात्र कधीच येणार नाही. Time Importance प्रत्येकाने पाळले पाहिजे. मित्रांनो प्रत्येक कामाचं एक नियोजन ठरवा , म्हणजे एखाद काम यशस्वीरीत्या तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर त्या कामाचं नियोजन असला पाहिजे . ते काम करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे आणि आणि ते सर्वोत्तम कसा होईल याच नियोजन केलं पाहिजे. काम जास्त असल्यास कधी तक्रार करू नका कामाचे योग्य नियोजन केले तर ते ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल.
वेळेचे महत्त्व | Time Importance
१. ध्येय सेट करा.
जसे आपण आयुष्याचे ध्येय सेट करतो. तसेच आपल्या दैनंदिन जीवनाचे आणि कामाचे ध्येय सेट करणे गरजेचे आहे. आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करायचे असल्यास आपण योग्य पद्धतीने वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. कि मला इतक्या वेळेत एवढे काम पूर्ण करायचे आहे आणि ते त्यावेळेत पूर्ण झाले पाहिजे. असे केल्याने तुम्हला सर्व गोष्टी वेळेत करण्याची सवय लागेल. आणि कमी वेळेत जास्त काम होऊ शकते.
२. कामाचे प्लांनिंग करा.
आपल्या दैनंदिन जीवनात काही महत्त्वाची कामे असतात त्याचे प्लांनिंग एक दिवस आधी करा. एखादे मोठे काम असेल तर त्याचे दोंन भागामध्ये विभाजन करा. आणि ठरवलेल्या प्लांनिंग प्रमाणे ते पूर्ण करा. आधीच प्लांनिंग केल्यामुळे आपला बराच वेळ वाचतो आणि जर आधीच जर आपले प्लांनिंग नसेल तर आपला विचार करण्यात वेळ जातो आणि पुढे उशीर होतो.
३. कामाची टाळाटाळ करणे बंद करा.
आपल्यापैकी काही लोक असे आहेत कि आजचे काम उद्या करू उद्याचे काम परवा करू आणि तो दिवस आला कि परत तेच तेच करणं यामुळे वेळ खूप वाया जातो. जी कामे खूप लहान लहान असतात तरी सुद्धा त्याची टाळाटाळ केली जाते. हि सवय बंद करा. असे केल्यानी जी तुमची महत्तवाची कामे असतात ती करण्यासाठी ऊर्जा राहत नाही. म्हणून Time Importance समजून घेणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो वेळेचे महत्त्व बाळगायला शिका , वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही .
४. एका वेळी एकाच काम करा.
एखाद आपण एकाचवेळी एकाच काम करत असतो तेव्हा आपण पूर्ण एकाग्रता लावून ते काम करतो म्हणून ते काम आपण आधी प्रभावीपाने आणि यशस्वी पद्धतीने वेळेच्या आधी पूर्ण करतो. पण जर आपण एकाच वेळी अनेक कामे एकत्र करत असू तर आपली ऊर्जा काम पडते. आणि ती विभागली जाते त्यामुळे कोणतेच काम पूर्ण होत नाही.म्हणून आपण एकाच कामात १००% ऊर्जा लावून काम केले तर ते वेळेत पार पडते.
५. ८०% आणि २०% असा नियम पाळा.
आपल्या जेवणातील प्रत्येक दिवसात म्हणजेच आपल्या आयुष्यात दोन प्रकाची कामे असतात. एक म्हणजे रोज ऑफिस ला जाणे दिवसभर तिथे काम करणे किंवा वर्क फ्रॉम होम करणे अशी महत्त्वाची कामे ८०% मध्ये येतात. ज्या कामाने आपली प्रगती होते आणि आपला फायदा होतो. आणि दोन म्हणजे tv बघणे , फोन बघणे ,गेम खेळणे ,चाटटींग करणे हि कामे आपल्या आयुष्यात २०% येत असतात. कारण अश्या कामांमधून आपल्याला कोणताही फायदा किंवा आपली प्रगती होत नाही.फक्त आपला वेळ वाया जातो.
६. कामाचा ABCDE फॉर्मुला ठरवा.
आपल्या आयुष्यात चार खूप महत्तवाची कामे असतात. ती चा भागामध्ये असतात.
- A – जी आपल्याला ध्येय प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची असतात.
- B – जी कामे महत्त्वाची आहे पण ती नाही झाली तरी आपल्या ध्येयावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
- C – जी कामे आपण केली तरी ठीक आहे आणि नाही केली तरी ठीक आहे.
- D – जी कामे आपण स्वतः ना करता दुसर्याकडून करून घेणे.
- E – जी कामे कधीच महत्तत्वची नसतात.
आपल्या कामाचा फॉर्मुला असा ठेवल्यामुळे आपली महत्त्वाची कामे लवकर मार्गी लागतात. आणि त्यांना लागणार तिने पण कमी लागतो. वेळेत पार पडतात. मित्रांनो जेव्हा तुम्हाला वेळेचे महत्त्व कळायला लागेल नक्कीच तुम्ही यशाच्या मार्गावर आहात.
७. सेल्फ डिसीप्लेन
आपल्याला आपल्या वेळेच्या महत्व कळण्यासाठी स्वतःलाच आपण डिसीप्लेन लावले पाहिजे. त्यामुळे आपले ध्येय कितीही मोठे असले तरी ते कमीत कमी वेळेत पूर्ण करू शकतो. रोजची कामे किंवा आपली कधी तरी असणारी महत्तवाची कामे स्वयंशिस्त लावल्यामुळे वेळेत पूर्ण होतील. तसेच स्वयंशिस्त लागल्याने अचानक काही कामे आली तरी ती आपण यशस्वीरीत्या वेळेत पूर्ण करू शकतो.
तुमच्या जीवनातील वेळेचे महत्त्व || Importance of time in life
- तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याला जास्त वेळ अजिबात लावू नका , पटकन एखादा निर्णय घेऊन टाका.
तुम्ही जर निर्णय घ्यायला जास्त वेळ लावला तर काहीच उपयोग होणार नाही. ज्यावेळी तुम्ही निर्णय घेणार त्याच्या नन्तर तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. जरी तुमचा निर्णय चुकला तरी तंतुम्हाला त्यातून अनुभव मिळेल आणि जर तुमचा निर्णय बरोबर असला तर तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. - मित्रांनो वेळेच्या बाबतीत संगायचे झाले तर खूप उदाहरणे आहेत ,पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्यावेळी निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळी काहीजण घेत नाही आणि नतर मग पश्चाताप करतात. मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही , आपल्या डोक्यात नेहमी समज तयार असतो अजून वेळ आहे. मित्रांनो तुम्ही आजचा वेळ कसा घालवत आहेत यावर तुमचे उद्याचे आयुष्य अवलंबून आहे.
- मित्रांनो आपण नेहमी काहीवेळा दुसऱ्यांना म्हणत असतो आपली पण वेळ येइल पण तस कधीच होत नाही कारण मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात चांगली वेळ आणण्यासाठी आता आपल्याकडे जो वेळ आहे तो आपण चांगल्या कामासाठी लावत नाही जर आपण आपला वेळ चांगल्या कामासाठी लावला तर आपल्याला आयुष्यात खूप चांगले दिवस बघायला मिळतील.
- मित्रांनो दुसरी गोष्ट अशी कि जे लोक सतत कामात व्यस्त आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सुद्धा जास्त वेळ देता येत नाही , त्यांना जास्त वेळ देता येत नाही अशा लोकांनी किमान आठ्वड्यामधील एखादा दिवस तरी त्यांच्या कुटुंबासोबत घालवावा.
- मित्रांनो जे काम तुम्हाला आज करायचे आहे ते आजच्या आजच पूर्ण करा त्याला उद्याचा दिवस लावू नका तुम्ही जर आळस केला तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही आणि तुम्ही जे काम हातात असेल ते वेळेच्या आधीच पूर्ण केले तर तर तुम्ही खूप यशस्वी व्हाल. मित्रांनो Time Importance अशा लोकांना माहित आहे ज्या लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही.
- मित्रांनो तुमच्या आयुष्य वेळेचे नियोजन ठेवा कारण कि खूप लोकांनी आयुष्यात खूप वेळ वाया घालवला आहे आणि एकदा का वय निघून गेलं कि काही उपयोग नाही , मित्रांनो जगामध्ये खूप यशस्वी आणि श्रीमंत लोक आहेत त्या लोकांनी वेळेचे नियोजन केलेले आहे. त्यानं Time Importance कळले .
- जर सुरुवातीचा ९५% तुम्ही तुमचा वेळ आरोग्य आणि बँक बॅलन्स बनवण्यासाठी खर्च केला तर नंतर ९९% जीवन तुम्हला तुमच्या मनाप्रमाणे जगता येईल.
५ वेळेचे महत्त्व पाळण्याचा टिप्स | 5 Importance of time
- स्वतःची कामे स्वतःच करा. कोणावरही आवलंबून राहू नका.
- कोणतेही काम करायला वेळ नाही किंवा वेळ कमी आहे असे म्हणून तक्रार नका.
- वेळे महत्त्व पाळण्यासाठी स्वतःला लावलेली स्वयंशिस्त काटेकोरपणे पाळा.
- वेळे चे नियोजन करून कामाचे योग्य भाग करा जेणेकरून ते वेळेत पूर्ण होतील.
- आपण आपले ध्येय पूर्ण जरी केले तरी वेळेला महत्त्व असुद्या ते कधीही सोडू नका.
- तुम्हाला वेळेचे महत्त्व जेव्हा कळेल तेव्हापासून तुमची कामे व्यवस्थित होतील आणि तुमचा प्रवास हा यशाच्या दिशेने चालू असेल.
हे वाचा – Motivational Quotes | मराठी प्रेरणादायी विचार
हे वाचा – Money Management Marathi | पैशांचे नियोजन मराठी
निष्कर्ष
आजच्या लेख मध्ये आपण Time Importance काय आहे हे पाहिलं. आणि आपण जरा Time Importance पाळले तर आपल्या आयुष्यासाठी ते किती उपयोगाचं आहे हे आपण समजू शकता. कारण वेळेचे महत्त्व जर आपण समजून घेतले नाही तर आपण आपल्या ध्येयाकडे कधीच वेळेत पोहचू शकणार नाही. मित्रांनो हि माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की शेअर करा आणि तुम्हाला काय वाटत ते आम्हला कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
read more – http://www.marathimahitii.com
проект дома в стиле кантри https://alfaplan-project.ru/.
заказать проект каркасного дома http://alfaplan-project.store/.
мкад пропуск msc-propusk.ru.