पैशांचे नियोजन मराठी || Money Management in marathi

आपल्या महिन्याच्या खर्चाचे आर्थिक नियोजन करणे , बचत करणे , योग्य ठिकाणी खर्च करणे , योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे ,अनावश्यक खर्च टाळणे आणि खर्चाची नोंद करणे हि पैश्याच्या नियोजनाची पहिली पायरी आहे. पैशाचं योग्य नियोजन करण्यासाठी योग्य योजना आखणे खूप महत्त्वाचे आहे. आपण खूप वायफळ खर्च करत असतो त्यामुळे आपल्याला ज्यावेळी गरज असते नेमके तेव्हा आपल्याला पैसे कमी पडतात. त्यासाठी आपण पैश्यांचे नियोजन ( Money Management ) केले पाहिजे . आजकाल खूप महागाई वाढली आहे आपण पैसे किती उडवतो , महिन्याला किती पैसे कमावतो कुठेतरी स्वतःवर सुद्धा कंट्रोल असला पाहिजे.  पैश्यांचे नियोजन कसे करावे ?

Money Management Marathi

पैसे झाडावर उगवत नाही हि मानसिकता तुम्हाला पैसा मर्यादित आहे असा विचार करण्यासाठी भाग पडते पण सत्य हे आहे कि पैसे झाडावर उगवतात आणि ती झाडे आहेत 

  1. कल्पना ( IDEAS )
  2. मालमत्ता ( ASSESTS )
  3. गुंतवणूक  ( INVESTMENT )
  4. व्यवसाय ( BUISNESS )

पैसे वाचवण्याच्या टिप्स | Money Management Tips 

१. खर्चाची नोंद ठेवा.

money management

तुम्ही तुमच्या पैश्याची नोंद ठेवत असाल तर हि तुमचा पैसे वाचवण्याची पहिली पायरी आहे. आपला महिन्याचा खर्च जर तुम्ही नोंद करून ठेवला तर आपल्याला कळते कि आपण किती खर्च केला आहे आणि किती बचत केली आहे. तसेच हे हि कळते कि आपला महिन्याचा होणार खर्च कुठे मर्यादित ठेवणे गरजेचे आहे यांची कल्पना येते. तसेच योग्यपद्धतीने पैश्यांचे नियोजन (Money Management) करण्यास मदत होते.

२. कार्ड पेमेंट कमी करा.

money management

कोरोनामुळे आजकाल कॅशलेस व्यवहार वाढला आहे. त्यामुळे आपण आता कॅश जवळ बाळगायला नको म्ह्णून कार्ड नेच पेमेंट जास्त करतो. कार्डने पेमेंट करत असल्यामुळे काही जास्त खर्च होऊ शकतो.त्यामुळे  आपण किती आणि काय खर्च करतोय यावर लक्ष ठेवणं कठीण जात. कार्डनेच पेमेंट करायचे आहे ना त्यामुळे काही अनावश्यक गोष्टीवर खर्च होतो. काही वेळा तर महिन्याचा पगार क्रेडिट कार्डची बिल्स भारण्यातच जातो. म्हणून कार्ड ने पेमेंट करणे कमी केल्यास आपला अनावश्यक खर्च होण्यापासून वाचू शकतो आणि पैश्यांचे नियोजन (Money Management) होण्यास मदत होते.

३. मासिक बजेट बनवा.

money management

तुमच्या महिन्याच्या खर्चानुसार तुम्ही तुमचे मासिक बजेट बनवा. बजेट बनवण्याची मुख्य कारण असे कि तुमच्या खर्चावर नियंत्रण राहू शकते. बजेट बनवल्यामुळे तुम्हला महिन्याच्या पगारातील रक्कमेतील २० % तरी बचत होऊ शकते. खर्चाचे बजेट ठरवल्यामुळे  Money Management करणं सोपे जाते.

४. गुंतवणूक करा.
.money management

पैश्याची बचत करण्याची दुसरी पायरी म्हणजे गुंतवणूक. गुंतवणुकी मुख्य उद्देश म्हणजे ठराविक कालावधीनंतर परतावा मिळणे. जेवढी तुमची गुंतवणूक वाढते तसे पैसे हि वाढतात. तुम्ही पुढील ५ वर्षात गुंतवणूक केली ती रक्कम सारखी राहणार नाही ती आणखी वाढू शकते. त्यामुळे सर्वानी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

५. विमा पॉलिसी.

आपली व आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची विमा पोलिसी असणे खूप गरजेचं झाले आहे. तसेच आपल्या मालमत्तेचा आणि व्यवसायाचा विमा उतरवणे हे आजच्या काळात खूप गरजेचे झाले आहे. पण अजून हि ते लोकांच्या लक्षात आले नाहीये. आपल्या जवळ योग्य विमा पॉलिसी असेल तर पुढे भविष्यात होणार आर्थिक नुकसान कमी होत त्यामुळे तुम्ही हि नक्की तुमची विमा पॉलिसी उतरवून घ्या.

६. फसवणुकीपासून सावध राहा.

आत्ताच्या काळामध्ये फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे आपण त्यापासून सतर्क राहिले पाहिजे. खूप लोकांचे फसवणुकीमुळे आर्थिक नुकसान होते त्यामुळे त्यांचे Money management ढासळते. काही फसव्या योजनाच्या आहारी जाऊन लोक त्यात पैसे गुंतवतात त्याबदल्यात भेटीचं लालूच दाखतात यामुळे खूप आर्थिक नुकसान होते म्हणून अश्या योजनांपासून दूर राहा. आणि सतर्क राहा.

७. नैतिकतेचे पालन करा.

पैश्याचे नियोजन (money management ) करताना आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी पैसे आणि वेळ खर्च कारण दोन्ही महत्तवच आहे. परंतु तात्पुरत्या सुखासाठी पैश्याची उधळपट्टी करू नका. गरज असेल तिथेच योग्यरीतीने पैश्यांचा वापर करा.

पैशांचे नियोजन करताना लक्षात ठेवा | Money Management in marathi

१- आपण जेवढे महिन्याला पैसे कमावत आहे त्याच्यापेक्षा कमीतकमी २० टक्के तुमची बचत असलीच पाहिजे. Money Management ला सुरुवात येथून होते.

२- ज्या तुमच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही खर्च करा पण ज्या गोष्टी तुमच्या उपयोगी नाहीत त्या गोष्टीसाठी पैसे खर्च करू नका.

३-गुंतवणूक करायला शिका . हा Money Management मुख्य टप्पा आहे.

४- आता गुंतवणूक करायची कुठे ( प्रॉपर्टी, स्टॉक मार्केट, गोल्ड , म्युच्युअल फंड जिथून तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत चालू राहतील अशा ठिकाणी गुंतवणूक करा.

५- जास्त कर्ज घेऊ नका तुम्हाला जितकी गरज आहे तितकेच कर्ज घ्या.

६- मित्रांकडून , नातेवाकांकडून उसने पैसे घेणे टाळा आणि जर पैसे घेतले असतील तर वेळेवर परत करत जावा.

७- स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यासाठी तुमच्याकडे स्टॉक मार्केटचे ज्ञान असले पाहिजे तुम्हाला व्यवस्थित ज्ञान नसेल तर गुंतवणूक नका करू.

८ – तुमच्याकडे १ वर्ष पुरेल इतकी सेविंग्स असली पाहिजे कधी संकट आलं तर आपल्याच कामाला येईल.

९-महागड्या गाड्या , महागडे फोन चैनीच्या वस्तू गरज नसेल तर घेऊ नका.

१०- जर तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील तर व्यवसाय करा. पैस्याने पैसा वाढवला जातो. चढ-उतार येत असतात आणि अनुभव पण येत असतो आणि अनुभवाच्या जीवावर माणूस यशस्वी होतो.मित्रांनो संकटाच्यावेळी आपल्याला कोणीच मदत करत नाही त्यामुळे आत्तापासूनच बचत करायला शिका.

११ – पैश्यासोबत स्वतःच्या आरोग्याकडेपण लक्ष द्या. तरुण वयात मेहनत करून पैसे कमावला तर तो म्हातारपणी योग्य ठिकाणी वापरता येतो.

१२ – मित्रांनो जर तुमच्याकडे पुरेसा वेळ शिल्लक राहत असेल तर काहीतरी नवीन स्किल शिकण्याचा प्रयत्न करत रहा. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकाल तेव्हा त्याचा वापर तुम्हाला पैशांचे सोर्स वाढवण्यासाठी उपयोगी येईल.

पैसे वाढवण्यासाठी हे नियम वापर |Money Management in marathi

  • पैसे वाढवायला किंवा बचत करायला तुम्हला खर्च कमी करावं लागेल किंवा पैसे जास्त कसे कमावता येईल याचा विचार करावा.
  • प्रत्येक महिन्याला आपल्या पगारामधून किंवा उत्पन्न मधून ठराविक रक्कमची गुंतवणूक करा.
  • गरज असेल तरच कर्ज काढा नाहीतर कर्जपासून दूर राहायचा प्रयत्न करा.
  • इमर्जंसी साठी काही पैसे सेव्ह करून ठेवा.
  • गरज नसलेल्या वस्तू, दिखाव्यासाठी वस्तू घेणे सुरुवातीला टाळा.
  • शेअर मार्केट बद्दल शिकून त्यात गुंतवणूक करा.
  • पैसे बचत करणे म्हणजे पैश्याला आराम करायला लावणे 
  • पैसे गुंतवणे म्हणजे पैश्याला कामाला लावणे.
  • मिञांनो जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही नवीन स्टार्ट अप्स मध्ये गुंतवू शकता यातून पण तुम्हाला चांगला फायदा होईल.

पैश्याच्या प्रवासाचे टप्पे लक्षात घ्या 

  1. पैसे कमावणे – कष्ट करून भरपूर पैसे कमवा.
  2. पैसे वाचवणे – जेवढे कमवाल त्यातले थोडे वाचवायला शिका.
  3. पैसे गुंतवणे – जेवढे वाचवलं त्यातले थोडे गुंतवा.
  4. पैसे वाढवणे – बचती सोबतच पैसे वाढवा.
  5. पैसे सांभाळणे – गरज आहे तेवढेच खर्च करा.
  6. पैश्याचा आनंद घ्या – जे पैसे वाढवले त्याचा म्हातारपणी आनंद घ्या.

निष्कर्ष 

आजच्या ब्लॉग मध्ये आपण पैसे कसे वाचवायचे तसेच त्याचे नियोजन कसे करायचे हे पहिले. त्याच बरोबर तुम्हला आजच्या लेखात हे हि कळलं असेल कि पैसे कसे वाढवायचे आणि त्यासाठी कोणते नियम , टिप्स आहेत आणि ते तुमच्या नक्कीच कमी येईल. मित्रांनो लेख आवडला तर नक्की शेअर करा तुम्हाला काय वाटत कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

Read more – तुमच्या जीवनातील वेळेचे महत्त्व मराठी माहिती || Time Importance Quotes In Marathi

Read more – http://www.marathimahitii.com

1 thought on “Money Management Marathi | पैशांचे नियोजन मराठी”

Leave a Comment