Instagram Marketing in Marathi| इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?

 

Instagram Marketing in Marathi | इंस्टाग्राम मार्केटिंग

instagram marketing marathi

मित्रांनो आज आपण बघणार आहोत Instagram Marketing कस करायचं. मित्रांनो Instagram Marketing हे खूप फायद्याचे आहे तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी. आजकाल खूप लोक इंस्टाग्राम च्या मदतीने वयवसाय वाढवायला मदत करतात. मित्रांनो तुम्ही इंस्टग्राम वर तुमचा बिसनेस वाढवू शकता आणि त्या सोबत तुम्ही इंस्टाग्राम वरून पैसे सुद्धा कमावू शकता

इंस्टाग्राम अकाउंट म्हणजे काय?

जगात सर्वात मोठ्या सोशल मीडिया च्या यादीत इंस्टाग्रामचे स्थान पहिले आहे. इंस्टाग्रामवर दार दुसऱ्या दिवशी नवीन खाते ओपन केले जाते.इंस्टाग्रामवर प्रत्येकाचे नाव वेगळे आहे. आणि ज्यांना आपण मान्यता देतो ते आपल्या अकाउंट वर जोडतात.आपण आपले नातेवाईक आणि मित्र मैत्रीण याना जोडतो.तसेच इंस्टाग्रामवर आपण आपला व्यवसाय देखील करू शकतो. त्यासाठी जास्तीत जास्त लोक तुम्हाला जोडलेलं हवेत.त्या आधी मित्रांनो तुम्हाला Instagram वर तुमचे बिसनेस पेज ओपन केले पाहिजे.

इंस्टाग्राम च्या अकॉउंट मध्ये तुमच्या बिसनेस बद्दल सगळी माहिती भरायची आहे. तुमच्या बिसनेस च नाव, तुमच्या बिसनेस ची वेबसाइट, तुमचा बिसनेस कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे त्या बद्दल माहिती भरायची आहे, त्यासोबतच तुमच्या कॉन्टॅक्ट ची माहिती भरायची आहे.तुमच्या इंस्टाग्राम च्या बिसनेस पेज ला फेसबुक चे पेज सुद्धा कनेक्ट करा. जर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम बिसनेस पेजवर एखादी स्टोरी टाकली तर ती तुमच्या फेसबुक अकॉउंट ला सुद्धा दिसेल त्यासाठी तुमहाला फेसबुक वर परत पोस्ट करायची गरज नाही.

तुम्हाला एखादा फोटो इंस्टाग्राम वर अपलोड करायचा असल्यास तो आकर्षक बनवण्यासाठी एडिटिंग ची सुविधा आहे. तुम्ही फोटो ब्लर , कॉन्ट्रास्ट ,इफेक्ट असे वेगवेगळे इफेक्ट देऊन फोटो आकर्षक बनवू शकता . मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रोफाइल बद्दल सगळी माहिती बिसनेस पेजवर वयवस्थित भरा. तुमच्या प्रॉडक्ट चे फोटो नियमित पणे पोस्ट करत जावा. इंस्टाग्राम वर तुम्हाला खूप लवकर प्रतिसाद मिळतो. मित्रांनो जर तुमच्या अकॉउंट ला फोल्ल्लोवेर्स जास्त असतील तर तुमचा बिसनेस वाढायला खूप मदत होईल. मित्रांनो फोल्लोवेर्स जास्त असल्यामुळे तुम्ही अपलोड केलेला फोटो , स्टोरी हि अनेक लोकांपर्यंत सहज पोहोचते. यामुळे खूप लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात ,तुमच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती विचारतात.

Instagram marketing marathi
Instagram marketing marathi

मित्रांनो आजकाल शॉर्ट्स विडिओ बनवण्याचा ट्रेंड जबरदस्त चालू आहे आणि याला प्रतिसाद खूप चंगळ मिळत आहे. तुमच्या प्रॉडक्ट काय आहे , ते कसे वापरायचे याचा छोटा विडिओ बनवून तुम्ही इंस्टाग्राम वर पोस्ट करू शकता. खूप लोक बिसनेस वाढवण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करतात .

इंस्टाग्राम मार्केटिंग करून बिजनेस प्रोमोटं कसा करायचा | Instagram Marketing Promotion.

 1. इंस्टाग्रामवरून बिजनेस प्रोमोटं करण्यासाठी सगळ्यात आदी तुम्हला तुमचे इंस्टाग्राम अकाउंट बिजनेस अकाउंट मध्ये कॉन्व्हर्ट करावे लागेल.
 2.  इंस्टाग्रामचे अकाउंट ओपन केल्यांनतर setting मध्ये जा त्यांनतर तिथे Switch to business Profile वर Click kra.
 3. जर तुम्ही facebook वापरात असाल तर तुमचे इंस्टग्राम अकाउंट facebook  ला joint  करा.
 4. तुमचे बिजनेस च्या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती तुमच्या अकाउंट वर पोस्ट kra
 5. तुमच्या बिजनेस प्रॉडक्ट पर्यंत लोकांनी पोहचण्यासाठी योग्य ती information अकाउंट मध्ये द्या.त्यामुळे लोकांना सोप्यारितीने प्रॉडक्ट विकत घेता येतील.
 6. बिजनेस अकाउंट ला स्विच केल्या नन्तर तुम्हला Promot option active होतील. तुमच्या अकाउंट वरच्या प्रत्येक पोस्ट खाली Boost post असे option येईल. त्यामुळे तुमच्या profile ची जाहिरात होईल आणि लोक तुमच्या अकाउंट वर attract होतील.

इंस्टाग्राम मार्केटिंग प्रमोशनच्या टिप्स | Instagram Marketing Tips Marathi

instagram marketing marathi

बिसनेस प्रोफाइल तयार झाल्यांनतर प्रमोशनसाठी वरचे प्रमोट बटन निवडावे लागते. ज्याचे प्रमोशन करायचे त्या व्यवसाय   , वस्तू अगर सेवेचा फोटो अपलोड करावा लागतो। तो निवडला कि दोन ओप्टिव मिळतील.
१ – Get More Profile And Website Visits – तुमचा वयवसाय ऑनलाइन असेल तर याचा वापर करता येईल.
२ – Reach People Near An Address – जवळपासच्या लोकांपर्यन्त पोहोचण्यासाठी याचावापर करता येईल.

वरीलपैकी एक Option  निवडल्या नंतर डिटेल्स भरण्यासाठी पेज मिळते. त्यामध्ये वस्तू , वयवसाय आणि सेवा या विषयी माहिती भारत येते. त्या नंतर Objective  मध्ये आसपास असणाऱ्या लोकांपर्यंत व्यवसाय पोहोचवणे तसेच बिसनेस प्रोफाइल वेबसाइट वर आणणे , या गोष्टी पार पडल्या जातात.

Destination – याद्वारे लोकांना वेबसाइटकडे आणायचे कि बिसनेस प्रोफाइलकडे हे ठरवावे लागते.

Action Button – यात लोक वेबसाइट अगर बिसनेस प्रोफाइल मध्ये आल्यानंतर त्यांनी काय करायला हवे , जसे , Learn More , Watch More , Contact Us हे निश्चित करावे लागते .

Audience – यावर जाऊन आपल्याला ऑडियन्स म्हणजेच यूजर्स निवडता येतात. जसे ठिकाणानुसार, आवडीनुसार , वय , लिंग , यानुसार , आपले बजेट आणि किती कालावधी प्रमोशन करायचे ? या गोष्टी यात भराव्या लागतात.

वरीलप्रमाणे सर्व माहिती भरल्या नंतर Instagram Marketing चे  प्रमोशन चे काम चालू होते. प्रमोशन ची माहिती खाली असलेल्या View Insights मध्ये मिळत राहते. यामध्ये प्रमोशन किती लोकांपर्यन्त पोहोचले ? , किती जणांना ते आवडले ?, किती लोकांनी कमेंट दिली ?, किती लोकांनी ते सेव्ह केले याच सर्व माहिती तुम्हाला View Insights द्वारे मिळते.

हॅशटॅग ( Hashtag ) – नवीन यूजर्स पर्यंत पोहोचण्यासाठी Instagram Marketing मध्ये हॅशटॅग चा वापर केला जातो. जेव्हा आपण एखादी पोस्ट अपलोड करताना हॅशटॅग जोडल्यास त्या पोस्ट ची लिंक तयार होते. त्यामुळे अधिक धिक यूजर्स कडून ती पोस्ट पहिली जाते त्यामुळे याचा वापर प्रमोशनसाठी करतात.

Instagram वर पेज बनवून पैसे कसे मिळणार?

instgram marketing marathi
Instagram marketing marathi
१. अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing

एखाद्या कंपनीच्या अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये व्हावे लागते. उदा. amazon, Flipkart , upstox , Zerodha आदी कंपनीच्या अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन त्यांची लिंक तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या bio मध्ये देऊन तुम्ही कमिशन द्यारे पैसे कमाऊ शकता. तुमच्या लिंक वरून जेवढे जास्त प्रॉडक्ट घेतले जातील तेवढे तुम्हाला कमिशन मिळत जाते.

२. ब्रँड सहयोग | Brand Collabration 

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोल्लोवेर्स असणे खूप गरजेचे आहे. म्हणजे किमान कमीत कमी १० हजार आणि जास्तीत जास्त ५० हजार तरी फोल्लोवेर्स असणे गरजेचे असते. तेव्हा दुसरे पेज किंवा एखादी प्रॉडक्ट विकणारी कंपनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करते. आणि त्याच्या पेजच किंवा त्यांच्या प्रॉडक्टच प्रोमोशन तुमच्या पेजवर करण्यासाठी तुम्हाला कमिशन देते.

३.ऑनलाइन लहान व्यवसाय | Online small business

इन्स्टाग्रामवर तुम्ही स्वतःचा लहान व्यवसाय चालू करू शकता.जर तुमचे स्वतःचे कपडे किंवा अन्य काही प्रॉडक्ट्स असतील त्या तुम्ही लोकांना online विकू शकता त्यातूनही तुमची चांगली कामे होऊ शकते. तसेच तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्सची कमी पैश्यामध्ये इंस्टाग्राम द्वारे जाहिरातही करू शकता. त्यामुळे तुमचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकत आणि तुमची विक्री वाढू शकते.

४. इंस्टाग्राम पेजची रिसेलिंग करणे | Instagram page reselling –

आज काही खूप जण आहेत कि ते इंस्टाग्राम अकाउंट तयार करतात आणि त्यावर जास्त फोल्लोवर्स जमा करतात आणि नंतर मग तेच अकाउंट एखाद्या ला ठराविक रकमेत विकून टाकतात. तसेच काही जण आधीपासूनच जास्त ट्रॅफिक असलेले पेज विकत घेतात ज्यांना इनबिल्ट ट्रॅफिक असलेले इंस्ट्रम पेज हवे असते.कारण याने त्यांचा वेळ वाचतो.जे कि काही जण या साठी वर्ष नि वर्ष घालवतात. म्हणून हा एक चांगला पर्याय आहे एखाद पेज रिसेल करून त्यातून पैसे कमाऊ शकता.

इंस्टाग्राम मार्केटिंग आडिया   | Instagram Marketing Ideas Marathi

 1. Use Link In Bio Tool
 2. Tell your story
 3. Post instgram reels
 4. Optimize your profile for search
 5. Use content from your business categories.
 6. Reply your follwers comments and dm’s
 7. Keep up to date with latest instagram trends.

इंस्टाग्राम मार्केटिंग लिमिट्स | Limits of Instagram Marketing Marathi

काही वर्षांपूर्वी इंस्टाग्राम ला कोणत्याही लिमिट्स नव्हत्या. म्हणजे इंस्टाग्राम follow आणि unfollow लिमिट्स या सारखी कोणती गोष्ट नव्हती. म्हणून इंस्टग्राम यूजर्स त्यांच्या अकाउंटवर त्यांचे follwers वाढवण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात फोटो ,व्हिडीओ पोस्ट करत होते. पण आज ह्या सगळ्यांना इंस्टाग्राम ने काही लिमिट्स सेट केल्या आहेत. कारण इंस्टाग्राम कडे अश्या लिमिट्सची स्वतःची करणे आहेत.२०२३ मध्ये इंस्टाग्राम मध्ये तुमचे follow आणि unfollow या दोन महत्तवाच्या बाबी आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष देणे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमची अकाउंट ब्लॉक होऊ द्यायचे नसेल तर इंस्टाग्रामच्या लिमिट्स लक्षात घेणं गरजेचं आहे.

१. इंस्टाग्राम पोस्ट लिमिट्स. 

आपण इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओच्या लिमिट्सवर कोणतीही मर्यादा नाही. पण तुमच्या अकाउंट वरील प्रत्येक पोस्ट मध्ये काही वेळ सोडा म्हणजे काही तास किंवा मिनिटे सोडा. एकाचवेळी जर तुम्ही अनेक पोस्ट करत असाल तर इंस्टाग्राम अल्गोरिथम ला असे वाटेल कि हे spam account आहे आणि त्यामुळे ते तात्पुरते ब्लॉक होऊ शकते.

२ . इंस्टाग्राम Follow , Unfollow लिमिट्स. 

इंस्टाग्रामवर followers ला काही खास मर्यादा नाही पण दर दिवशी १०० followers  नेसर्गिक पद्धतीने वाढू शकतात. आणि Unfollow साठी दिवसाला १०० ते १५० unfollow करू शकता. लक्षत घ्याकी इंस्टाग्राम ला सर्व गोष्टी नेसर्गिक पद्धतीने दिसल्या पाहिजे अन्यथा तुमचे अकाउंट ब्लॉक होऊ शकते.

 ३. इंस्टाग्राम like लिमिट्स. 

इंस्टाग्रामवर तुम्ही like करू शकतील अश्या पोस्ट ची सर्वाधिक संख्या ३०० ते ४०० अशी आहे. पण हि संख्या इंस्टाग्राम वापरकरणाऱ्यांसाठी स्थिर संख्या नाही. म्हणून तुम्हाला तुमचे खाते ब्लॉक करण्यापासून वाचवायचे असल्यास तुम्ही दर दिवशी २०० पर्यंत like करू शकता.

४. इंस्टाग्राम comment लिमिट्स. 

आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर लिहिण्याची मुभा आहे त्यामुळे आपण दररोज १८० ते २०० च्या दरम्यान कॉमेंट करू शकतो. तसेच प्रति तासाला तुम्ही १० ते १२ कॉमेंट्स लिहू शकतात. पण त्याबरोबर हे हि लक्षात घ्या कि एकाच कंमेंट तुम्ही अनेकवेळा केली नाही ना  नाहीतर इंस्टाग्राम ला ते spam करत आहे असे वाटू शकते.

५. इंस्टाग्राम DM (Direct Massage) लिमिट्स.

जसे बाकीच्या गोष्टीवर इंस्टग्रामच्या लिमिट्स आहेत तसे DM (Direct Massage) वरही आहेत. तुम्ही दररोज किती massage पाठवू शकता यावर मर्यादा आहेत. जर आपलं इंस्टाग्राम अकाउंट ऍक्टिव्ह असेल आणि तीन महिन्यांपेक्षी जास्त जुने असेल तर आपल्याला दररोज ५० ते १०० massage करण्याची मुभा आहे.

 अश्याच अजून इंस्टग्राम लिमिट्स शॉर्ट मध्ये खालीलप्रमाणे जाणून घेऊ 

 1. Followers  – 10- 20 प्रति तास / 100 – 200 प्रति दिवस.
 2. Likes  – 120 प्रति तास / 300 – 500 प्रति दिवस.
 3. Comments – 20 – 50 प्रति तास / 200 प्रति दिवस.
 4. Unfollows  – 10- 30 प्रति तास / 100 – 150 प्रति दिवस.
 5. Hashtags – 30 nos. प्रति पोस्ट
 6. Dm’s  –  50 – 70 प्रति दिवस.
 7. Stories  – 100 प्रति दिवस.
 8. Highlight title – 12 शब्द
 9. Bio – 150 शब्द
 10. Captions –  2200 शब्द
 11. Reels Length –  60 – 90 सेकंड
इंस्टाग्राम मार्केटिंग बुक्स-

१.Instagram Marketing Instagram marketing

२.Instagram marketing secrets 2023

Instagram marketing in marathi

3. Instagram Influancer instagram marketing in marathi

Read  more – इंस्टाग्राम marketing –https://marathimahitii.com/instagram-marketing-marathi/

Read  more – व्हाट्स अँप marketing –https://marathimahitii.com/instagram-marketing-marathi/

Frequently Ask Question –

1 – इंस्टाग्राम मार्केटिंगसाठी कसे वापरायचे ? || How Instagram Can Be Used For Marketing ?

फोटो , विडिओ , स्टोरीस यांच्या माध्यमातून प्रॉडक्ट ची जाहिरात करून हव्या असणाऱ्या ग्राहकांपर्यन्त पोहोचणे म्हणजे Instagram Marketing होय. इंस्टाग्राम वर बिसनेस पेज तयार करून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची जाहिरात करू शकता इथे तुम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळतो. आजकालच्या काळात मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी इंस्टाग्राम चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला असून त्याला प्रतिसाद झटपट मिळत आहे. जवळपास बरेच लोक हे इंस्टाग्राम वरील पोस्ट पाहून खरेदी करतात. त्यामध्ये कपडे , शूज , मेक अप साहित्य , दागिने , फॅशन शी निगडित गोष्टी खरेदी करतात. ऑनलाइन खरेदी खूप मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम वर चालते.

2 – मार्केटिंगसाठी इंस्टाग्रामच का ? || Why Is Instagram A Good marketing Tool ?

इंस्टाग्राम वापरणारे खूप यूजर्स हे किमान एखाद्या प्रॉडक्ट किंवा ब्रँड ला फॉलो करतात. तर काही यूजर्स ना प्रॉडक्ट बद्दल माहिती मिळत असते. खूप सारे यूजर्स हे एखादे प्रॉडक्ट पाहून त्या प्रॉडक्ट ला खरेदी करण्याचा निर्णय घेतात. इंस्टाग्राम वरील आकर्षक फोटो तसेच प्रमोशनल विडिओ हा यूजर्स ना तात्काळ आकर्षित करतो , यामुळे यूजर्स हा ग्राहक बनण्याची शक्यता दाट असते. यूजर्स हे फोटो आणि व्हिडिओस पाहून प्रॉडक्ट खरेदी करण्याचा निर्णय घेत असतात त्यामुळे Instagram Marketing साठी खूप फायदा होत आहे.

३. इंस्टाग्राम मार्केटिंग कसे कार्य करते? How does Instagram marketing work? 

तुमचे प्रॉडक्ट आणि सर्विस जास्त लोकं पर्यंत पोहचवण्याची काम इंस्टग्राम करते. ज्यांना आपले प्रॉडक्ट आणि सर्विस आवडते ती लोक आपल्या ब्रँड ला जोडले जातात.मग जोडलेल्या लोकांमुळे अजून लोकांना आपले प्रॉडक्ट दिसू लागते त्यामुळे लोकांपर्यंत आपला ब्रँड पोहचवणे सोपे जाते.

४. मी इंस्टाग्राम मार्केटिंग कसे सुरू करू? How do I start Instagram marketing? 

 1. तुमची इंस्टाग्राम स्ट्रॅटेजी ठरवा.
 2. इंस्टाग्राम मार्केटिंगचे ध्येय ठरवा.
 3. इंस्टाग्राम वरील प्रेक्षक निश्चित करा.
 4. इंस्टाग्रामवर ब्रँड निर्माण करा.
 5. इंस्टाग्रामचा followers बेस वाढावा.

५. Instagram तुम्हाला पैसे देऊ शकते? Can Instagram pay you? 

हो.इंस्टग्राम वरून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत

How to make money from Instagram in Marathi | इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?

निष्कर्ष

मित्रांनो तुम्हाला Instagram Marketing Marathi हि माहिती पहिली. आपल्या लहान मोठ्या बिसनेस साठी सोशल मीडिया मार्केटिंग ची आत्ताच्या काळात गरज हि लागणार आहे.त्यामुळे मित्रांनो तुम्हाला Instagram Marketing Marathi हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा आणि तुम्हाला काय वाटत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा काही सल्ला असल्यास तेही कंमेंट मध्ये सांगा.
मित्रांनो तुम्ही व्हॉट्स अँप मार्केटिंग करून तुमच्या व्यवसाय वाढवू शकता कसे ते जाणून घेऊया ?

1 thought on “Instagram Marketing in Marathi| इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?”

Leave a Comment