Successfull | यशस्वी होण्यासाठी काय करावे

 

यशस्वी होण्यासाठी काय करावे || Successfull

 

successfull

जीवनात यशस्वी होण्याची सूत्र .

१. नियमितपणा 

आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी नियमितपणा असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपण आपला वेळ आणि कामचे  योग्यरितीने नियोजन केले पाहिजे आणि ते आपण नेहमी पळाले पाहिजे त्यामुळे आपली नियमितता कायम राहू शकते.

२.परमार्थपणा 

बहुतेक लोकांना खूप लालसा असते म्हणजेच बाहेरचे वैभव आणि मोठी पदवी या पदाची लालसा असते. पण जर आपण आपला आत्मा समाधानी ठेवला तर त्यापासून आपल्याला दूर राहता येते. आणि त्यामुळे परमार्थ साधता येऊ शकेल. आणि आपल्या यश साठी ते खूप महत्तवच आहे.

३. समर्पण 

आपण जे काम करत आहोत ते काम करताना आपण सहज यशस्वी होत नाही त्यासाठी आपल्याला कधीकधी काही त्याग करावे लागतात. आणि आपण जेवढं त्या कामासाठी स्वतःला समर्पित करू तेवढ्या लवकर ते काम यशस्वी होते.

४. मनोधर्य 

आपण जे काम करत आहोत ते कसे होईल ? यशस्वी होईल कि नाही ? कसे होईल ? अश्या निगेटिव्ह गोष्टीपासून आपण दूर राहील पाहिजे. त्यामुळे आपण मनोधैर्याने केलेल्या कामातून आपल्याला नक्कीच यश मिळते.

५. सामर्थ्य 

आपण आपले काम नेहमी आपल्या शक्ती आणि सामर्थ्याच्या जोरावर केले पाहिजे. प्रेत्येकाच्या आयुष्यात नेहमी एक सामर्थ्य आणि शक्ती देणारी गोष्ट असती त्यामुळे आपल्या कामाला नक्कीच यश मिळते.

६. स्पर्धा 

यशस्वी होण्याचें सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे स्पर्धा आहे. आजच्या काळात स्पर्धा खूप वाढली आहे. पण तरी सुद्धा आपण आपले काम वारी पाच हि सूत्र लक्षात ठेऊन काम करणे गरजेचे आहे. आणि आपल्याला नक्कीच यशस्वी होण्यापासून कोणी थांबू नाही शकणार.

७  – लाज 

मित्रांनो कोणतेही काम करताना लाज बाळगू नका . या एका गोष्टीमुळे खूप लोक मागे राहिलेली आहेत . तुम्ही जे काम करता त्याच्यावर लोक तुम्हाला काय म्हणतील याचा विचार तुम्ही कधीच करू नका . लोक कायम नाव ठेवायला असतात . तुम्हाला स्वतःच अस्तित्व निर्माण करायचा आहे . त्यामुळे कधीही कुठेही काम करताना अजिबात लाज बाळगू नका .

यशस्वी होण्यासाठी काय करावे || Successfull

– तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठ व्हायचं असेल तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे करावेच लागतील त्याच्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतील.👍

– तुम्हाला तुमच्यावर विश्वास असला पाहिजे . तुम्ही जे काम करत आहात त्याच्यामध्ये सातत्य असल पाहिजे त्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक अधिक कुशल होत जाल.👍

– लोकांनी तुम्हाला कितीही विरोध केला तरी तुमचा तुमच्यावर आणि तुमच्या कामावर विश्वास असला पाहिजे.👍

– मित्रांनो नेहमी चांगल्या लोकांच्या संगती मध्ये राहत जा त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप फायदा होईल . आपल्याला संगत चांगली असेल तर आपण चुकीच्या मार्गाला जात नाही .👍👍👍

– लोकांनी कितीही काहीही म्हणू दे पण तुम्ही जो निर्णय घेत आहात त्याच्यावर ठाम राहत जा. मिञांनो तुमचा ठामपणा हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठं बनवेल.

– मिञांनो तुम्ही एकटे आहात असा विचार कधीच करू नका, तुम्ही एकटेच पुरेसे आहात असा विचार नक्की करा.

  – मित्रांनो नेहमी successfull लोकांच्या सानिध्यात राहत जावा त्याचा खूप फायदा चांगला होईल. आपल्याला यशस्वी लोकांकडून खूप शिकायला मिळेल. ते त्यांच्या आयुष्यात कसे successfull  झाले आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

रोज स्वतःशी या ५ ओळी बोला | 

 1. मी ते करू शकतो.
 2. मी सर्वोत्तम आहे.
 3. मी विजेता आहे.
 4. मी यशस्वी होणार.
 5. आजचा दिवस माझा आहे.

स्वतःची खरंच किंमत ओळखायची असेल तर स्वतःला आयुष्याच्या दुनियादारीमध्ये ढकलून द्या ज्या गोष्टी अनुभवल्या नाहीत ना त्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो या जगात जर स्पर्धा तुम्हाला करायची असले तर ती स्वतःशीच करा या जगात तुम्हाला हरवणारे फक्त तुम्हीच आहेत .

successfull होण्यासाठी हे गुण प्रत्येकाकडे असले पाहिजे |Successful life

 1. प्रामाणिकपणा 
 2. आत्मविश्वास 
 3. वेळेचे नियोजन
 4. ऐकून घेण्याची क्षमता 
 5. संवाद कौशल्य.

माणूस स्वतःचे नुकसान कस करून घेतो?

 1. वेळेचे नियोजन करत नाही .
 2. गरज नसलेल्या वस्तू विकत घेणे .
 3. पैश्याचे हिशेब नसणे 
 4. दिखावा करणे .
 5. पैश्याची बचत ना करणे.
 6. रिटायरमेंट साठी नियोजन नसणे.
 7. नकारत्मक विचार करणे.
 8. कमावण्या आधी  खर्च करणे.
 9. वाईट सवयीचे व्यसन लागणे.
 10. अधिक मोबाईल वापरणे.

स्वतःला सुधारण्याचे मार्ग | Successful Person 

 1. ध्यान करा.
 2. वाचन करा.
 3. दुसरांकडे कमी लक्ष द्या.
 4. स्वतःवर विश्वास ठेवा.
 5. सकाळी लवकर उठा.
 6. नवीन स्किल्स शिका.
 7. वाईट सवाई सोडा.
 8. वेळेचा उपयोग करायला शिका.
 9. कोणाशी हि तुलना करू नका.
 10. एका वेळी एका गोष्टीवर लक्ष द्या.
 11. तुमचे दोष मान्य करा.
 12. अपयशकडे नवीन संधी म्हणून पहा.
 13. सतत नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा.
 14. Active राहण्याचा प्रयत्न करा.
 15. काम करताना आळस करू नका.

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉईंट येतो आणि त्यांनतर आयुष्यात खूप बदल होतो . स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्यावेळी होत असते . ज्यावेळी तुमच्यावर जबाबदारी नसते त्यावेळी तुम्ही बिनधास्त असता पण ज्यावेळी तुमच्यावर एक जबाबदारी पडते त्या वेळी तुम्हाला जाणीव होते जीवन म्हणजे काय आहे ? काही गोष्टी  हळू हळू उलगडू लागतात .

ज्यावेळी तुमच्या जवळ उत्पन्नाचे काहीच साधन नसते , तुम्ही एकटे असता , तुमच्याकडे पैसे नसतात तुमच्यावर जबाबदारी असते मित्रांनो अशा परिस्थिती मध्ये माणसाला जो अनुभव येत असतो आणि यातून तो जे काही शिकत असतो ते त्याला आयुष्यात खूप महत्त्वाचे ठरते . तुम्ही यशस्वी त्यावेळी होत असतात जेव्हा तुमच्याकडे जास्त पैसे असतो म्हणून नाही तुम्ही ज्या परिस्थिती मधून जे शिकला जो काही अनुभव तुम्हाला भेटला त्याच्या मुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग सापडला . 

हे नक्की वाचा –

Money Management Marathi | पैशांचे नियोजन मराठी

Marathi Status

Mutual Fund In Marathi | म्युच्युअल फंड किती रिटर्न देतात?

Time Importance Quotes In Marathi | तुमच्या जीवनातील वेळेचे महत्त्व मराठी माहिती

1 thought on “Successfull | यशस्वी होण्यासाठी काय करावे”

 1. Write more, thats all I have to say. Literally, it
  seems as though you relied on the video to make your point.
  You definitely know what youre talking about, why throw away your intelligence on just posting videos to your weblog
  when you could be giving us something enlightening to read?

  Reply

Leave a Comment