how to become rich in india || भारतात श्रीमंत कसे व्हावे ?

Table of Contents

How To Become Rich In India || भारतात श्रीमंत कसे व्हावे ?

मिञांनो आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर या गोष्टी करा(.How To Become Rich In India )जे लोक त्यांच्या जीवनामध्ये का यशस्वी आहेत आणि त्यांनी अस काय केलं जे ते लोक आज खूप यशस्वी झाले आहेत. मिञांनो काही लोक फक्त गोष्टी ऐकत असतात पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्या गोष्टी करत नाहीत काहीना काही कारण काढून त्या गोष्टी कडे दुर्लक्ष देतात. आज आपण पाहणार आहोत भारतात राहून श्रीमंत कसे बनायचे

मिञांनो तुम्ही कधी त्यांच्या सारख जीवन जगणार. आज जे लोक यशस्वी झाले आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सांगायला लागत नाही, त्यांना दाखवायला लागत नाही की ते यशस्वी आहेत त्यांच्या वागण्यातून त्यांचं यश हे दिसून येत असत. गरज आहे आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची.

How to become rich in India

1यशस्वी लोकांसोबत राहा.

मिञांनो जर तुम्हाला लवकर यश मिळवायचे असेल तर तुमची संगत चांगल्या आणि यशस्वी लोकांसोबत असणं खूप गरजेचं आहे .जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांसोबत उठबस करत असता तेव्हा तुम्ही यशाच्या (How To Become Rich)दिशेकडे असता. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कसं यश मिळवलं याचा अनुभव तुम्हाला मिळत असतो.

2वेळ

मिञांनो यशस्वी लोक वेळेला खूप महत्व देतात. ते त्यांची कामे अगदी वेळेवरच पुर्ण करत असतात. तशी सवय लावून घेणे खूप गरजेचे आहे आपण स्वताला. जर तुमच्याकडे वेळ आहे तर काहीना काही त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करा जेणेकरून तुमच्यावर कामाचा लोड येणार नाही. शक्यतो सकाळी लवकर उठून दिवसभरात ठरवलेली कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा.कारण काम कोणतेही असो ते वेळेत होणे गरजेचे असते.

वेळेचे महत्व येथे वाचा

3 – कर्ज घेणे टाळा.

मिञांनो माणूस एकदा कर्जाच्या जाळ्यात अडकला की त्याला लवकर बाहेर पडताच येत नाही. एक कर्ज मिटवण्यासाठी लोक दुसरी कर्ज घेतात आणि त्यात अडकत जातात. जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढेच कर्ज घेणे जरुरी आहे. नाहीतर आयुष्यभर कर्जाचे हफ्ते भरावे लागतात. त्याला योग्य वेळीच आवर घाला. ज्यांच्याकडून तुम्ही उसने पैसे घेत असाल तर त्याला वेळच्या वेळी पैसे देत चला. त्यामुळे संबंध चांगले राहतात.

4 – निर्णय घेणे

मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच यशस्वी लोक असतात ते एखादी गोष्ट करताना जास्त विचार कधीच करत नाही ते लगेच निर्णय घेऊन ती गोष्ट पूर्ण करण्यास प्राधान्य देतात . काही लोक फक्त विचार करत बसतात आणि एकदा का वेळ हातातून निघून गेली कि मग त्यांना खूप वाईट वाटत . मित्रांनो जर तुम्ही निर्णय घेण्यास उशीर करत असाल तर तुम्हाला काही दिवसांनी किंवा वर्षांनी त्रास होईल त्यापेक्षा लवकरात लवकर निर्णय घ्यावा . निर्णय जरी तुमचा चुकला तरी तुम्हाला त्यातून मिळणार अनुभव असेल तो लाख मोलाचा असेल आणि निर्णय योग्य असेल तर तुम्हाला खूप यश मिळेल .

5 – उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करा .

मित्रांनो यशस्वी लोकांकडे वेगवगळे उत्पन्नाचे स्रोत असतात . आणि त्यातून त्यांना विविध मार्गांनी पैसे येत असतात . यशस्वी लोक हे खूप ठिकाणी गुंतवणूक करत असतात. जसे कि, रियल इस्टेट , शेअर बाजार , गोल्ड , विविध कंपन्या , नवनवीन स्टार्टअप्स . मित्रांनो तुम्ही सुद्धा असे स्रोत निर्माण करा ज्याणेंकरून तुम्हाला पैसे विविध मार्गानी येत राहतील . कधीच कोणावर अवलंबून राहू नका . तुम्ही जीवनामध्ये खूप यशस्वी व्हाल .

6 – लाज बाळगू नका.

मिञांनो कोणतंही काम हे कमीपणाच नसतं. तुम्ही जे काम करता त्याची कधीच लाज बाळगू नका. आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल तर कोणतं हि काम करण्याची तयारी ठेवा , काम करताना कमीपणा कधीच बाळगू नका . काम करत असताना घाबरून न जात बिनधास्त पणे काम करा . एकदा तुम्हाला कामाची सवय लागली कि तुमचा आत्मविश्वास वाढेल . त्यानंतर  तुम्ही यशाच्या मार्गाने प्रवास करायला सुरुवात कराल फक्त कधीच लाज बाळगू नका.

7 – वाचन करा

मित्रांनो तुमच्या कामांमधून तुम्हाला थोडा जरी वेळ मिळाला तरी वाचन करत जावा . अशी पुस्तके तुमच्याजवळ बाळगा जी तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करतील . रोज किमान दहा पाने वाचण्याचा प्रयत्न करा . यशस्वी लोक वाचन जास्त करत असतात त्यामुळे त्यांच्या विचारात बदल होत असतो . ते एखादे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतात .

8 – नियमित व्यायाम करणे

मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात व्यायाम खूप महत्वाचा आहे . यशस्वी लोक हे त्यांच्या व्यायामा कडे खूप लक्ष देतात तसेच ते स्वतःला फिट ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात . जेव्हा आपण त्यांना भेटत असतो तेव्हा ते नेहमी फ्रेश असतात . ते लोक रोज सकाळी लवकर उठतात . मित्रांनो तुम्हीपण सकाळी लवकर उठून जर व्यायाम केला तर तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास तयार होईल जो तुमच्या कामामध्ये तुम्हाला खूप फायद्याचा ठरेल .

9  – व्यसन करू नका

मित्रांनो तुमच्या आयुष्यात व्यसन अजिबात करू नका . जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत वाईट मार्गाला अजिबात लागू नका. स्वतःच नेहमी स्वतःला समजावून सांगत जावा .

10 – नवनवीन स्किल्स

मित्रांनो तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही सतत नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत राहा. तुमच्या कामामध्ये लागणारे स्किल्स तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये घडवा , जेणेकरून तुम्ही तुमची कामे लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य द्याल . तुमच्या वरच्या लेवल वर काम करत असणारी लोक काम कस करतात , किती वेळात करतात , आपण ते काम कसे करू शकतो याचा विचार नेहमी करत राहा .

11 – गुंतवणूक करा.

मित्रानो आपल्या कमाईतील किमान १०% तरी गुंतवणुकी साठी ठेवले पाहिजे. बचत केल्याने त्याचा फायदा आपल्या आपल्याच भविष्यासाठी होतो. त्यामुळे बचतीचे आणि गुंतवणुकीची सवय लावून घेणे खूप गरजेचे आहे.असे केल्याने तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकता (How To Become Rich).तुम्ही गुंतवणुकी साठी तुमचे पैसे स्टॉक ,मुतुअल फंड या मध्ये करू शकता. यामध्ये तुम्हाला जास्तच फायदा होतो.

मुतुअल फंड म्हणजे काय ? येथे वाचा

12 – ध्येय ठरवा.

मित्रानो श्रीमंत होण्यासाठी आपल्याला आपले ध्येय ठरवले सर्वात जास्त गरजेचे आहे. आपल्या जो विषय आवडतो म्हणजेच ज्या फिल्ड मध्ये काम करण्यास आवडते काम करण्यास रस असतो ते काम करा.एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी आपले ध्येय ठेवणे खूप गरजेचे आहे.म्हणतात कि माहिती हीच एक उत्तम शक्ती आहे . आपल्या आवडत्या फिल्ड ची माहिती घ्या वाचन करा, आणि आपले लक्ष्य ठरवा.एका शोधानुसार जगातील श्रीमंत ८०% लोक अशी आहेत ज्यांनी आपले लक्ष्य ठरवले आणि ते मिळवण्यासाठी रात्र दिवस मेहनत केली.तुम्ही हि नक्कीच श्रीमंत व्हाल.

प्रेरणादायी पुस्तके  जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि सकारात्मक विचार करण्यासाठी मदत करतील.

  1. स्वतःवर विश्वास ठेवा. ( Believe in your self )

www.marathimahitii.com

Check Here 

2.How to Become Rich

check here

मित्रांनो वरील माहिती प्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात तस वागण्याचा प्रयत्न जर केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल .आणि एक दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी असाल .
मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा आणि तुम्हाला काय वाटत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा .

FAQ-

१ – झटपट श्रीमंत होण्यासाठी काय करावे ?

मित्रांनो लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुम्ही महिन्याला जेवढे पैसे कमवता त्याच्याएक्षा जास्त पैसे कमवणे गरजेचे आहे . त्यासाठी तुम्हाला सतत नवनवीन गोष्टी शिकणे गरजेचे आहे . जेव्हा नवीन गोष्टी तुमच्यामध्ये आत्मसात होतील तेव्हाच तुमची प्रगती होईल , येणारे पैसे ची योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकता.

 


Best Business Idea In Marathi || बेस्ट बिझनेस आयडिया मराठी
Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायी विचार
Time Importance Quotes In Marathi | तुमच्या जीवनातील वेळेचे महत्त्व मराठी माहिती

 

 

 

 

 

Leave a Comment