Digital Marketing In Marathi | डिजिटल मार्केटींग मराठी

 

Table of Contents

डिजिटल मार्केटींग मराठी  | Digital Marketing In Marathi

Digital Marketing

डिजीटल मार्केटिंग ( Digital Marketing)  -आजकालच्या युगात प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आणि मोबाईल कसा वापरावा हे आजकाल शिक्षित व अशिक्षित लोक अगदी सहजपणे वापरत आहे . आजकाल प्रत्येकाला इंटरनेट म्हणजे काय हे माहिती आहे आणि लोक सहजपणे याचा वापर करत आहे .व्यवसाय वाढीसाठी आपण Digital Marketing Marathi आपण पाहणार आहोत . आजचे युग हे इंटरनेट आणि सोशल मीडिया चे आहे. मोबाईल चा वापर हा आजकाल खूप वाढला आहे. इंटरनेट मुळे आपण खूप लोकांच्या संपर्कात असतो आजकाल शहरात आणि ग्रामीण भागात इंटरनेट आहे. ज्या लोकांच्या संपर्कात आपण आहे अशा लोकांना आपण ग्राहक बनवण्यासाठी सर्वात आधी आपला व्यवसाय इंटरनेट सोबत जोडला गेला पाहिजे. आजकाल प्रत्येक व्यवसायामध्ये स्पर्धा वाढली आहे. इंटरनेट आणि तंत्रज्ञान चा वापर करून आपण जे मार्केटिंग करणार आहे त्याला Digital Marketing असे म्हटले जाते.

        आजकाल स्मार्टफोन म्हणजे छोटा कम्प्युटर आहे.आजची तरुणाई खूप वेळ सोशल मिडिया ला देतात. फेसबुक , इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब हे सोशल मिडिया आजकाल प्रत्येकाकडे आहे आणि प्रत्येकजण याचा खूप वापर करतो. आजकाल एखादी घटना, एखादी बातमी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यच्या वेगाने पसरत होत जाते आणि खूप फेमस होते .

        व्हॉट्सॲप , फेसबुक , इंस्टाग्राम याचा आजकाल व्यवसाय वाढीसाठी केला जातो. याचा वापर करून खूप लोकांनी त्यांच्या व्यवसायात प्रगती केली आहे. सोशल मीडिया , तुमच्या व्यवसायाची वेबसाईट ,या गोष्टीचा व्यवस्थित वापर करून व्यवसायामध्ये खूप मोठी भरारी घेता येऊ शकते. एकदा तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आला की तुमचा व्यवसाय वाढायला मदत मिळते. व्हॉट्सॲप , फेसबुक , यूट्यूब , ट्विटर , इंस्टाग्राम , इमेल ॲप्स यासारख्या गोष्टींना आजकाल खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.कमी खर्च करुन खूप लोकांच्या सोबत आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकतो आणि आपला व्यवसाय वाढवू शकतो. Digital Marketing याला ऑनलाईन मार्केटिंग असे म्हणतात.छोटे व्यावसायिक , महिला बचत गट , नवीन व्यवसाय सुरू केलेले लोक आजकाल याचा वापर करीत आहे. आजकालच्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर याचा वापर नक्की केला पाहिजे.

डिजिटल मार्केटिंग चे महत्व | Importance of Digital Marketing In Marathi

गेल्या २ ते ३ वर्षपासून आपल्या सर्वाना covid विषाणूचा सामना करावा लागला आणि त्यामुळे बऱ्याच लहान मोठ्या व्यवसायाना फटका बसला आहे. खूप उद्योग ठप्प झाले आहेत. मार्केटमध्ये lockedown जाहीर केल्यामुळे लोकांना बाहेर पडणे शक्य नाही आणि त्यामुळे व्यवसाय आपोआप बंद पडत आहेत. त्यामुळे Digital Marketing चे प्रमाण वाढले. लोक जास्त online खरेदी विक्री करू लागले. आपला व्यवसाय प्रभावीपणे करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा आणि आज कालच्या आधुनिक पद्धतीचा उपयोग  करून घ्यावा लागेल.

डिजिटल मार्केटिंग का महत्वाचे आहे?
  • आपल्या सर्विस आणि प्रॉडक्टचा प्रचार करण्यासाठी Digital Marketing हा सोपा मार्ग आहे.
  • ऑनलाईन मार्केटिंग हे ऑफलाईन मार्केटिंग पेक्षा खूप कमी खर्चात चालू होते.
  • Digital Marketing मुळे आपल्या कंपनीचे मूल्य वाढण्यास मदत होते.
  • Digital Marketing मध्ये आपल्या उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी भरपूर वेगवेगळे मार्ग आहेत.
  • Digital Marketing मुळे आपल्या उत्पादनाचा प्रचार आपण जागतिक स्तरावर करू शकतो.
  • Digital Marketing मुळे चांगला परतावा मिळतो.
  •  Digital marketing मुळे कमी वेळात जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येते.

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार | Types of Digital Marketing In Marathi

 

Digital marketing

 

१. सर्च इंजिन ऑप्टिमायझशन | Search Engine Optimization

सर्च इंजिन ऑप्टिमायझशन ( SEO ) म्हणजे आपल्या website ला गुगलच्या पहिल्या पेजवर  सर्वात वरच्या स्थानावर पोहचवण्याचे काम SEO करते. त्यामुळे आपल्या website वर जास्त ट्रॅफिक येते आणि  आपला व्यवसाय वाढायला मदत होते. त्यामुळे बऱ्याच कंपन्या त्यांच्या वेबसाइटच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) वर हजारो ,लाखो रुपये खर्च करतात. पण त्यासाठी  आपल्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) याचे योग्य ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) चे आपण जर तज्ज्ञ असू तर आपल्याला त्यासाठी नोकरी सुद्धा लागू शकते.

२. अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing

Digital Marketing मध्ये अफिलिएट मार्केटिंग हा महत्त्वाचा भाग आहे. या सारख्या मार्केटिंग मध्ये आपण online कंपनीचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस  लोकांपर्यंत पोहचवतो आणि त्याबदल्यात आपल्याला कमिशन मिळते. Amazon , फ्लिपकार्ट या सारख्या बऱ्याच online website अफिलिएट मार्केटिंग आपण सुरु करू शकतो. त्यासाठी आपल्याला अकाउंट त्या online website वर Open करावे लागते. अकाउंट open झाल्यांनतर ज्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस  च मार्केटिंग करायचं आहे त्याची लिंक मिळते. त्या लिंक वरून लोकांनी प्रॉडक्ट आणि सर्व्हिस खरेदी केल्यास आपल्याला त्याचे कमिशन मिळते. 

३ . सोशल मीडिया मार्केटिंग | Social Media Marketing

आजच्या काळात social Media हा काही लोकांसाठी नवीन किंवा अवघड असा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही. आज सगळ्यांचे social Media वर अकाउंट आहे. आणि काही तरुण पिढी आता या social Media वर अकाउंटचा वापर social Media marketing म्हणून करतात. social Media हे लोकांपर्यंत पोहचण्याचे त्याच्याशी कनेक्ट राहण्याचे सगळ्यात सोपा मार्ग आहे social Media  marketing करण्यासाठी.  social Media  marketing करण्यासाठी त्याचे माध्यम खालील प्रमाणे आहेत.

  1. फेसबुक 
  2. इंस्टाग्राम 
  3. यूट्यूब 
  4. पिंटरेस्ट 
  5. ट्विटर 
  6. व्हाट्स अँप
  7. गुगल प्लस 

Read  more – इंस्टाग्राम marketing –https://marathimahitii.com/instagram-marketing-marathi/

Read  more – व्हाट्स अँप marketing –https://marathimahitii.com/instagram-marketing-marathi/

४ . अँप्स मार्केटिंग | Apps  Marketing

आजच्या काळात सगळ्यांकडेच स्मार्टफोन आहेत अगदी लहान पासून जेष्टापर्यंत सगळ्यांकडे आहेत.त्यामुळे Google Playstore हे सगळ्यांना माहित आहे. Google playstore मध्ये आपल्याला सर्व मोठ्या वेबसाइट्सचे apps पहायला मिळतात. आणि आज लोक बऱ्याच website च्या app वरून खरेदी विक्री करत असतात. फक्त खरेदी विक्रीसाठीच apps  चा वापर नाही तर Money transfer, online ticket booking , games , न्यूज आणि सोशल मीडिया या आणि अश्या बऱ्याच गोष्टीसाठी app चा वापर होतो. त्यासाठी कंपनी app बनवतात.

५ .ईमेल मार्केटिंग | Email Marketing

कोणत्याही कंपनी साठी ई-मेल मार्केटिंग महत्त्वाचा भाग आहे. त्याचे कारण असे कि कंपनी देत असलेली नवीन ऑफर नवीन सेवा जास्तीत जास्त लोकंपर्यंत पोहचवता यावी. ई-मेल मार्केटिंगमुळे जास्त ट्रॅफिक आणि व्हिसिटर्स येऊ शकतात त्यामुळे कंपनी बाकीच्या मार्केटिंगच्या सोबतच ई-मेल मार्केटिंग वर हि जास्त भर देते. जेणेकरून लोक आपले प्रॉडक्ट आणि सर्विस पाहू शकतील आणि खरेदी देखील करतील. 

६. गूगल अ‍ॅडवर्ड्स | Google Adwords

बऱ्याच लोकांना माहित नसते कि आपण जी इंटरनेटवर जाहिरात पाहतो ती कोठून येते ? तर ह्याचे उत्तर असे आहे कि “Google Adwords ”  द्वारे ह्या जाहिराती दाखवल्या जातात. Google adwords च्या मदतीने आपण आपले प्रॉडक्ट आणि सर्विस  लोकंपर्यंत पोहोचवू शकतो.  ही एक सशुल्क सेवा आहे ज्यासाठी आपल्याला काही ठराविक किंमत google la द्यावे लागते. पण Google adwords च्या मदतीने आपण असंख्य ग्राहकांपर्यंत आपल्या प्रॉडक्ट आणि सर्विसची माहिती पोहचवू शकतो. आपण गूगल अ‍ॅडवर्ड्सद्वारे कोणत्या प्रकारच्या जाहिराती चालवू शकतो ते खालीलप्रमाणे पाहुयात.

  • डिस्प्ले जाहिरात ( Display )
  • इमेज जाहिरात ( Image )
  • टेक्स्ट जाहिरात ( Text )
  • विडिओ  जाहिरात ( Video )
  • पॉप उप  जाहिरात ( Pop-up )
  • जीआयएफ जाहिरात (GIF) 

डिजिटल मार्केटिंग चे फायदे | Benefit of Digital Marketing In Marathi

१. ठराविक ऑडियन्सला टार्गेट करा.

तुम्ही तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस google ad च्या मदतीने तसेच social media  च्या मदतीने विशिष्ट ग्राहकांकडे पोहचू शकता. विशिष्ठ ग्राहक म्हणजे वय, ठिकाण , छंद यानुसार ग्राहकाला टार्गेट करू शकता. आणि ads चालवू शकता. तुमच्या प्रॉडक्टच्या संबंधित  लोकांना सहज लक्ष करू शकता.तसेच ग्राहक वर्गानुसार त्यांना चांगल्या ऑफर्स देऊ शकता. आजपर्यंत ज्यांना तुम्ही तुमचे प्रॉडक्ट आणि सर्विस दिली आहे त्यांचे review घेऊन त्यांना काही चांगल्या ऑफर देऊ शकता. असे केल्याने तुमचा ग्राहक वर्ग वाढू शकतो आणि तुमच्या प्रॉडक्टची विक्री जास्त वाढू शकते आणि फायदा हि चांगला होतो.

२. कमी खर्च आणि उच्च निकाल.

ट्रेडडिशनल मार्केटिंग पेक्षा डिजिटल मार्केटिंग खूप कमी खर्चात होत. म्ह्णून आत्ताच्या स्मार्टफोन च्या काळात लोक डिजिटल मार्केटींग कडे वळली आहे. तुम्ही कमीत कमी खर्च मध्ये डिजिटल मार्केटिंग करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचता. कारण डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही डिजिटल कॅम्पिंगन करू शकता तसेच चांगल्या ऑफर्स कमी खर्चात देऊ शकता त्यामुळे ग्राहक वर्ग जास्त आकर्षित होतो.

३. प्रोफेशनल बिसनेस प्रोफाइल. ( Website ) 

तुम्ही तुमच्या बिसनेस ची आकर्षक प्रोफाइल website तयार करा जेणेकरून ग्राहक आकर्षित होईल. आत्ताच काळ हा स्मार्टफोनचा असल्यामुळे आपल्या बिसनेसची website असणं हि एक मूलभूत गरज झाली आहे असे म्हणायला काहीं हरकत नाही. website असल्यामुळे ग्राहकांना आपला बिसनेस प्रोफाइल ओंलीने शोधणे सोपे जाते आपल्या प्रॉडक्ट आणि सर्विस बद्दल माहिती कळणे सोपे जाते. तसेच एखाद्या ग्राहकाला आपले प्रॉडक्ट आवडल्यास तो आपली website त्याच्या फ्रण्ड्स सर्कल मध्ये शेअर केली जाते. आणि आपल्याला हि डायरेक्ट ग्राहकांना आपली प्रोफाइल शेअर करता येते. website असल्यामुळे आपला ओंलीने प्रेझेन्स स्ट्रॉंग बनतो.आणि जास्त लीड्स मिळतात.

४. जेनरेट लीड्स  आणि  इन्क्रिज रेट.

तुम्ही तुमच्या ठराविक ग्राहकांना टार्गेट केलं कि जास्त कॉन्व्हर्जन रेट मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग , ई-मेल मार्केटिंग , गुगल ऍड ,ब्लॉग्स इत्यादींचा वापर करून जास्तीत जास्त लीड्स जनरेट करू शकता.आणि याचा उपयोग करून कॉन्व्हर्जन रेट वाढवू शकता.

५. इन्क्रिज कस्टमर लॉयल्टी.

पारदर्शक डिजिटल मार्केटींग मुले आपण आपल्या ग्राहकांचा आपल्यावरचा विश्वास वाढवू शकतो. यासाठी आपली मदत करते ती आपले बिसनेस website . वेबसाईट तयार केली तर आपला बिसनेसचा प्रॉफोलिओ ग्राहकांना दिसतो.त्यामुळे आपण आपल्या ग्राहकांसोबत आणि आपले ग्राहक आपल्या सोबत डायरेक्ट कॉम्युनिकेट करू शकतात. 

डिजिटल मार्केटर काय करू शकतात?

डिजिटल मार्केटर खूप काही करू शकतात. सध्याच्या स्मार्टफोन च्या काळात डिजिटल मार्केटर ची गरज तेवढीच आहे जेवढी कि डिजिटल मार्केटिंगची.डिजिटल मार्केटर समोर खूप पर्याय आहेत कारण यामध्ये खूप निश आहेत. त्यातून एखादी निश घेऊन त्यातच योग्य तो अभ्यास करून त्यामध्ये मास्टर बानू शकतात.

१. डिजिटल मार्केटर नोकरी.

तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनी मध्ये डिजिटल मार्केटर च्या पदावर काम करू शकतात. कारण कोणतीही नामांकित कंपनी असली तरी आत्ताच्या काळानुसार तिला डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. त्याबदल्यात कंपनी तुम्हाला चाबगला मोबदला हि देते.

२.. फ्रीलान्सर.

तुम्ही वेगवेळ्या लोकांकडून, कंपनीकडून प्रोजेक्ट घेऊन ते त्यांना पूर्ण करून देणे म्हणजे फ्रीलान्सर वर्क. तसेच त्यांच्या प्रोजेक्ट नुसार किंवा आपल्या कामनुसार ते आपल्याला पैसे हि देतात. फ्रीलान्सिंग वर्क करून तुम्ही महिन्याला लाखो मध्ये उत्पन्न मिळवू शकता.

३. बिसनेस ( Digital Agency )

तुम्ही तुमची स्वतःची डिजिटल एजेंसी चालू करू शकता. त्यामुळे तुम्ही लहान – मोठ्या कंपनी ला सर्विस देऊ शकता. तसेच तुमच्या हाताखाली फ्रीलान्सर ला जॉब ला ठेऊ शकता.

निष्कर्ष (Conclusion):

डिजिटल मार्केटिंग हे आजच्या काळाची गरज झाली आहे. आपल्या व्यवसायच्या वाढीसाठी डिजिटल मार्केटिंग हे गरजेचे आहे हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल. आजच्या बदलत्या काळामुळे डिजिटल मार्केटिंग हे खूप गरजेचे आहे. त्यामळे खूप कंपनी डिजिटल मार्केटिंग एजन्सी ला कामे देतात. पण त्याआधी आपले प्लॅन्स तयार असावे.आणि कमीतकमी खर्चात कसे करता येईल हे पाहावे.Digital Marketing In मराठी हा लेख तुम्हाला आवडला असेल तर कंमेंट करा.

Read  more – http://www.marathimahitii.com

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

FAQ

१. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

ans – इंटरनेट च्या मदतीने आपले प्रॉडक्ट आणि सर्विस लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.

२. डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे ?

ans – हो नक्कीच आजच्या बदलत्या काळामुळे डिजिटल मार्केटिंग गरजेचे आहे. डिजिटल मार्केटिंगमुळे कंपनी चे प्रॉडक्ट आणि सर्विस वेगाने लोकांपर्यंत पोहचते म्हणून डिजिटल मार्केटिंग गरजेचे आहे.

३.डिजिटल मार्केटिंग हे चांगले करिअर आहे का?

ans –  डिजिटल मार्केटिंगमुळे  कंपनी ची सर्विस किंवा प्रॉडक्ट लोकांपर्यंत लवकर पोहचवता येते त्यामुळे कंपनी डिजिटल मार्केटिंग एजन्सी ला कनेक्ट होतात. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग मध्ये चांगले करियर आहे.

४. डिजिटल मार्केटिंगसाठी मला कोणती कौशल्ये आवश्यक आहेत?

ans – डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची आवड असणे गरजेचे आहे तरच आपण यशस्वी डिजिटल मार्केटर बानू शकतो.

५. टॉप डिजिटल मार्केटिंग स्किल्स कोणते?

ans – १. सर्च इंजिन ऑप्टिमिझशन SEO 

         २. विडिओ मार्केटिंग 

         ३. सोशल मीडिया मार्केटिंग 

         ४. ई-मेल मार्केटिंग 

Share Market In Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती

Time Importance Quotes In Marathi | तुमच्या जीवनातील वेळेचे महत्त्व मराठी माहिती

1 thought on “Digital Marketing In Marathi | डिजिटल मार्केटींग मराठी”

Leave a Comment