Best Business Idea In Marathi || बेस्ट बिझनेस आयडिया मराठी

Table of Contents

बिझनेस आयडिया मराठी

मिञांनो आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे आणि आपली मराठी माणसं व्यवसायामध्ये खूप कमी प्रमाणात आहे. मराठी माणसाने पुढे गेले पाहिजे आणि व्यवसायामध्ये उतरले पण पाहिजे. मारवाडी , गुजराती , राजस्थानी लोक बाहेरून येतात . ते त्यांचा व्यवसाय उभा करतात आणि खूप मोठे होतात. मिञांनो खालील Business Idea Marathi तुमच्या उपयोगाला येतील.

मिञांनो तुम्ही पण व्यवसाय करा छोटासा असला तरी चालेल स्वतःचा व्यवसाय चालू करा. चला तर आज पाहू अगदी कमीत कमी भांडवल मध्ये आपण कोणता व्यवसाय चालू करू शकतो. यासाठी आज आपण पाहणार आहोत Business Idea In Marathi . मित्रांनो आपली मराठी लोक व्यवसाय खूप कमी प्रमाणात करत आहेत . भविष्यात प्रत्येक मराठी घरातील माणसाने व्यवसायामध्ये उतरून काम केले पाहिजे .

Business Idea In Marathi
Business Idea In Marathi

 

१ चहा विक्री करणे. ( Business Idea In Marathi  )

Best Marathi Business Idea
Best Marathi Business Idea

 

मिञांनो चहा हे अस पेय आहे की कोणीही सहज पिऊ शकतो. मिञांनो चहा च्या व्यवसाय हा कमी भांडवल मध्ये आपण चालू करू शकतो . अगदी आपण 10 ते 15 हजारमध्ये सुद्धा हा व्यवसाय चालू करू शकतो. मिञांनो चहाची एक टपरी टाकायची जिथे गर्दी असेल तिथे . गर्दीच्या ठिकाणी चहाची टपरी सुद्धा खूप चांगली चालते. फक्त मेहनत घ्यायची तयारी पाहिजे . कॉलेज , शाळा , चौक तसेच गर्दीची ठिकाण बघायची आणि चहाचा व्यवसाय चालू करू शकता .

मित्रांनो आजकाल खूप चहाचे ब्रँड तयार झाले आहेत , जर तुमच्याकडे भांडवल जास्त असेल तर तुम्ही चहाच्या ब्रँड ची फ्रँचाइज घेऊन दुकान टाकू शकता यातून सुद्धा तुम्हाला महिन्याला चांगले पैसे मिळतात .

२ – फळ विक्री करणे . ( Business Idea In Marathi  )

मित्रांनो तुम्हाला अगदी ५०,००० रु पर्यंत व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही फळ विक्री करून सुद्धा चांगले पैसे कमावू शकता. मित्रांनो तुम्ही गर्दीच्या ठिकाणी किंवा हॉस्पिटल च्या शेजारी एखाद छोटं दुकान  जर चालू केले तर तुम्ही नक्कीच चांगले पैसे कमावू शकता . मित्रांनो तुमच्या दुकानात  वर नेहमी ताजी आणि स्वच्छ फळ ठेवलेली असावीत जेणेकरून लोक त्यांच्याकडे पाहून आकर्षित होतील आणि तुमच्याकडून फळे विकत घेतील . मित्रांनो या व्यवसायामध्ये मेहनत घ्यायची तयारी पाहिजे . तसेच मार्केट मधून ताजी फळे आणून विकली पाहिजे . मित्रांनो लोकांना एकदा माहित झालं कि गर्दी वाढेल आणि तुमचा व्यवसाय सुद्धा वाढेल . यातून तुम्ही दिवसाला दोन हजार रुपयांहून अधिक कमवू शकता.

३- स्नॅक्स सेंटर ( Business Idea In Marathi )

मिञांनो तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तर स्नॅक्स सेंटर सुद्धा खूप चांगले चालते. मिञांनो यासाठी तुमच्याकडे कमीत कमी ५०,००० रुपये पाहिजे . यामध्ये तुम्ही स्नॅक्स सेंटर चालू करू शकता. यामध्ये तुम्ही चहा , कॉफी, नाष्टा असे पदार्थ ठेवू शकता.

मिञांनो तुमच्या पदार्थाला जर छान चव असेल तसेच तुमचे दुकान नीटनेटके असेल तर स्नॅक्स सेंटर मधुन सुद्धा तुम्ही चांगली कमाई करू शकता. चौक, रहदारीच्या ठिकाणी तुम्ही छोटस स्नॅक्स सेंटर चालू करू शकता. मेहनत आहे पण फायदा पण तेवढाच जास्त आहे.

४ – फ्रूट ज्यूस सेंटर ( Business Idea In Marathi )

मिञांनो तुमच्याकडे कमी भांडवल असेल तर तुम्ही फ्रूट ज्यूस सेंटर चालू करू शकता.  यासाठी तुम्हाला आधी ज्यूस बनवायला यायला पाहिजे. एकदा तुम्ही व्यवस्थित शिकलात की तुम्ही स्वतःचा दुकान चालू करू शकता.

मिञांनो ज्यूस सेंटर हे १२ महिने चालूच असत. तसेच आजकाल लोक फिटनेस कडे लक्ष देतात तसेच भरपूर लोक दिवसातून एकदातरी फ्रूट ज्यूस पित असतात. यातून सुद्धा तुम्ही दिवसाला दोन हजारापेक्षा जास्त कमाई करू शकता. मिञांनो ज्यूस सेंटर चालू करायचे असेल तर रहदारीच्या ठिकाणी , चौक , शाळा , कोलेज, हॉस्पिटल जवळ चालू करू शकता.

५ – टेलरिंग व्यवसाय (Business Idea In Marathi )

मित्रांनो टेलरिंग व्यवसाय सुद्धा खूप चांगला आहे. आजकाल मार्केट मध्ये जेंट्स टेलर आणि लेडीज टेलर सुद्धा आहेत. तुम्ही जर हे काम शिकलात तर तुम्ही महिन्याला खूप चांगले पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे . तुम्हाला चांगला अनुभव आला की तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. अगदी 50,000 रू सुरुवातीला तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.

यासाठी तुम्हाला एक छोटं दुकान लागेल किंवा तुमच्या घरी पुरेशी जागा असेल तरी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. हळू हळू लोक यायला लागली की लवकरच तुमचा व्यवसाय वाढीस लागेल .

६ – मंथली मेस / घरगुती डबे (Business Idea In Marathi )

मिञांनो खानावळ किंवा घरगुती डबे चालू करून सुद्धा तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. कमीत कमी भांडवल मध्ये हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. यासाठी तुमच्याकडे जागा पाहिजे नसली तर भाड्याने जागा घ्यावी आणि तिथे खानावळ चालू करावी. तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी बायका लागतील ज्यांना स्वयंपाक चांगला येतो अशा. हळू हळू लोक येतील , त्यांना माहिती पडेल आणि एकदा का चव लागली की गर्दी वाढेल आणि तुमचा व्यवसाय वाढीस लागेल.

घरगुती डबे चालू करण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगला स्वयंपाक करणाऱ्या बायकांची गरज पडेल किंवा ज्यांना येतो ते स्वतः सुध्दा चालू करू शकता. कॉलेज स्टुडंट्स, कामवाली लोक, हॉस्टेल वरची मुले अशा लोकांना नेहमी जेवणाचा डबा लागत असतो. अशा लोकांसाठी जर तुम्ही सेवा चालू केली तर खूप चांगला व्यवसाय चालेल.

७ – कोचिंग क्लासेस (Business Idea In Marathi )

मिञांनो तुमचं जर चांगल शिक्षण झालं असेल तर तुम्ही कोचिंग क्लासेस घेऊन सुद्धा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. यासाठी तुम्हाला कामाचा अनुभव असला पाहिजे. तुमचा अभ्यास चांगला पाहिजे . यामध्ये तुम्ही चांगली कमाई करू शकता. कारण इथे भांडवल कमी लागत . तुमच्या डोक्याचा जास्त वापर होत असतो. मग तुम्ही शाळेतल्या , कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेऊ शकतात. यात तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमची फी आकारून शिकवू शकता नाहीतर एकदमच फी घेऊन शिकवू शकता.

तुमचं शिकवण जर विद्यार्थ्यांना चांगलं कळत असेल तर तुमच्याकडे काही दिवसातच खूप विद्यार्थी येतील यात तुमचं स्वतःच ज्ञान खूप चांगल वाढेल आणि विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होईल आणि तुमचा व्यवसाय चांगला वाढेल . विद्यार्थ्यांना जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना समजावून सांगणं देखील गरजेचे आहे.

८ – भाजी विक्री करणे (Business Idea In Marathi )

मिञांनो तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असल्यास आणि तुमच्याकडे भांडवल कमी असल्यास तुम्ही भाजी विकून सुद्धा चांगले पैसे कमावू शकता. मिञांनो यासाठी तुम्हाला मार्केट मधुन ताजी भाजी आणून तुमच्या दुकानामध्ये लावायची आहे.

रोज ताजी भाजी आणल्यामुळे लवकर विकली जाते आणि पैसे ही रोख मिळत असतात.भाजी विकताना तुमचे दुकान स्वच्छ आणि नीटनेटके असेल याची काळजी घेतली पाहिजे. जर भाजी ताजी आणि योग्य दरात विकली तर तुम्ही दिवसाला खूप चांगली कमाई करू शकता.

९ – वडापाव चा स्टॉल चालू करणे. (Business Idea In Marathi )

मिञांनो वडावाप हा सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. भरपूर लोक रोज नाष्टा साठी वडापाव खातात. आपण बाहेर आलो की थोडी भूक लागली की वडापाव खातो. तुम्ही जर वडापाव चा स्टॉल चालू केला तर तुम्ही सुद्धा चांगली कमाई करू शकता.

आज एक वडापाव कमीत कमाई १५ रू ला आहे. गर्दीच्या ठिकाणीं, चौक , कॉलेज , शाळा अशा ठिकाणी जर तुम्ही स्टॉल चालू केला, आणि तुमच्या वडापाव ला छान चव तुम्ही दिली तर रोज तुम्ही दिवसाला ३०० ते ४०० वडेपाव आरामात विकू शकता. आणि रोज दिवसाला ४ ते ५००० रुपये कमावू शकतात .

१० – लहान मुलांचे कपड्याचे दुकान (Business Idea In Marathi )

मिञांनो तुमच्याकडे सुरुवातीला १ ते २ लाख रू असतील तर तुम्ही लहान मुलांचे कपड्याचे दुकान चालू करू शकता. मित्रांनो कपड्याचे दुकान खूप चांगले चालते आणि जर तुम्ही चांगल्या व्हरायटी तसेच नवनवीन ऑफर्स जर ठेवल्या तर नक्कीच तुमच्या दुकानात गर्दी होईल.

यासाठी तुम्हाला दुकानात चांगल्या प्रकारे लहान मुलांचे कपडे ठेवले पाहिजेत आणि योग्य दरात लोकांना विकले पाहिजे.मिञांनो दुकानाच्या बाहेरच्या बाजूला कपडे असे लावा की लोकांचं लक्ष आकर्षित होऊन ते तुमच्या दुकानाकडे येतील. दुकान नीटनेटके आणि स्वच्छ ठेवले पाहिजे .हळू हळू गर्दी वाढत जाईल आणि तुमचा व्यवसाय सुद्धा वाढेल . जर तुमच्याकडे मार्केटिंग स्किल्स चांगले असतील तर तुम्ही ऑनलाइन सुद्धा चांगल्या प्रकारे सेल करू शकता .

११ – ऑनलाइन प्रॉडक्ट सेलिंग ( Business Idea In Marathi )

मित्रांनो जर तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट असेल तर ते तुम्ही ऑनलाइन सुद्धा त्याची विक्री करू शकता किंवा तुमचे फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर फॅन फॉलोवर्स जास्त असतील तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची जहिरात करून प्रॉडक्ट विक्री करू शकता . तसेच तुम्ही दुसऱ्या कंपन्यांचे सुद्धा प्रॉडक्ट ऑनलाइन पद्धतीने विकू शकता यासाठी तुम्ही कंपनीकडून पैसे चार्ज करू शकता .

१२ – घरगुती फराळ ( Business Idea In Marathi )

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र मध्ये आपण कुरडई , चकली , पापड अशे अनेक पदार्थ आपण उन्हाळ्याच्या सिजन्स मध्ये करत असतो . मित्रांनो खूप साऱ्या गृहिणी हे पदार्थ बनवण्यात खूप पारंगत असतात . तुम्ही हे पदार्थ तुमच्या जवळच्या किराणा दुकान तसेच फूड प्रॉडक्ट चे शॉप असतात तेथे तुम्ही विकू शकता . तसेच जर तुमचं नेटवर्क चांगला असेल तर तुम्ही हे पदार्थ बाहेरच्या देशात सुद्धा विकू शकता . मित्रांनो याला सुद्धा खूप मागणी आहे बाजारात .

मित्रांनो तुम्हाला Business Idea In Marathi माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा आणि तुम्हाला काय वाटत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा .

 

 Instagram Marketing Marathi| इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?
Digital Marketing In Marathi | डिजिटल मार्केटींग मराठी
 Facebook Marketing In Marathi| फेसबुक मार्केटिंग म्हणजे काय?

 

 

 

 

 

 

Leave a Comment