Affiliate Marketing In Marathi || अफिलिएट मार्केटिंग मराठी

Affiliate Marketing In Marathi 

 

Affiliate Marketing Marathi

मित्रांनो आज आपण Affiliate Marketing in Marathi या बद्दल माहिती घेणार आहोत . मित्रांनो अफिलिएट  मार्केटिंग हि खूप जुनी पद्धत आहे . सध्याच्या डिजिटल युगात हि पद्धत वापरली जाते . यामध्ये तुमच्या प्रॉडक्ट ची लिंक वापरून प्रॉडक्ट चे प्रमोशन केले जाते . यातून प्रॉडक्ट ची विक्री होते आणि कमिशन सुद्धा मिळते . मित्रांनो आजकाल खूप सारे लोक अफिलिएट  मार्केटिंग चा वापर करून पैसे कमावत आहे ,मित्रांनो तुम्ही सुद्धा पैसे कमावू शकता . जाणून घेऊया Affiliate Marketing Marathi बद्दल .

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ? ( Affiliate Marketing In Marathi )

मित्रांनो आजच्या डिजिटल काळात ऑनलाइन शॉपिंग चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे . आणि आजकाल खूप लोक अफिलिएट  मार्केटिंग करून पैसे कमवत आहे .अफिलिएट  मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट किंवा वस्तू विकल्या नंतर जे आपल्याला कमिशन मिळते त्याला अफिलिएट  मार्केटिंग असे म्हणतात . आपल्या वेबसाइट वर  प्रोडक्ट ची लिंक देऊ शकता आणि त्या  लिंक वर कोणी क्लिक केले आणि ते प्रॉडक्ट खरेदी केले कि त्यातून थोडे पैसे आपल्याला मिळतात यालाच अफिलिएट  मार्केटिंग असे म्हणतात .

अफिलिएट  मार्केटिंग काम कसे करते ?

मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला अफिलिएट  प्रोग्रॅम मध्ये तुम्हाला तुमचे अकॉउंट ओपन करावे लागेल . एकदा का तुमचे अकॉउंट ओपन झाले कि तुम्हाला प्रॉडक्ट ची लिंक मिळते .जसे कि तुम्ही ऍमेझॉन चा अफिलिएट  प्रोग्रॅम जॉईन केला आणि तुम्ही एखादे प्रॉडक्ट सर्च केले कि तुम्हाला त्याची अफिलिएट  लिंक मिळेल .

हि लिंक image, Baner आणि link यांच्या स्वरूपात असते . हि लिंक तुम्ही तुमच्या सोशल मिडिया वर शेअर करू शकता आणि जर कोणी लिंक वर क्लिक करून वस्तूची खरेदी केली तर त्याचे कमिशन सुद्धा तुम्हाला मिळते .मित्रांनो amazon ,flipkart , hostinger , Go Daddy या कंपन्यांचे अफिलिएट  मार्केटिंग जास्त प्रमाणात करतात.

अफिलिएट  मार्केटिंग ची सुरुवात कशी करावी  ? 

मित्रांनो बाजारात खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत ज्यांचे तुम्ही अफिलिएट  मार्केटिंग करू शकता , आज आपण पाहूया Amazon कंपनी सोबत कसे अफिलीयेत मार्केटिंग करू शकतो .

१ – मित्रानो सगळ्यात आधी Amazon वर तुमचे अकाउंट असणे गरजेचे आहे . Amazon च्या वेबसाइट वर गेलात कि Become An Affiliate या  option वर क्लिक करावे .

Affiliate Marketing In Marathi

२ – Amazon Associates – Amazon’s affiliate marketing program हा प्रोग्रॅम तुम्हाला जॉईन करायचा आहे .

Affiliate Marketing In Marathi

३ – प्रोग्रॅम रजिस्टर करताना तुम्हाला Name, Address, email id, phone No, payment Details , blog / website ऍड्रेस या बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे .

४ – सर्व माहिती भरून झाली कि तुम्हाला confirmation चा मेल येईल आणि तुमचे अकॉउंट ओपन होईल . Amazon प्रत्येकाला एक आयडी देत असते .

५- जेव्हा तुमचे अकाउंट ओपन होईल तेव्हा तुम्हाला डॅशबोर्ड सुद्धा दिसेल . त्यानंतर तुम्ही एखादे प्रॉडक्ट आणि त्याची लिंक कॉपी करून इतरांना किंवा सोशल मेडिया वर शेअर करू शकता तसेच तुमच्या ब्लॉग वर देखील पोस्ट करू शकता .

अफिलिएट मार्केटिंग विषयी महत्तवपूर्ण संकल्पना.

अफिलिएट मार्केटिंग मध्ये काही संकल्पना वापरल्या जातात. या संकल्पना म्हणजेच Terms खूप महत्वाच्या असतात.त्या खालीलप्रमाणे आपण पाहू.

१. अफिलिएट्स ( Affiliates ) –

जे व्यक्ती कोणत्यातरी अफिलिएट प्रोग्रॅम ला जॉईंट झालेले असतात त्यांना अफिलिएट्स म्हंटले जाते. हे अफिलिएट्स एखाद्या कंपनी च्या अफिलिएट प्रोग्रॅम ला जॉईंट होऊन त्यांचे प्रॉडक्टची जाहिरात करतात म्हणजे त्यांच्या स्वतःहा च्या profile वर त्यांची जाहिरात करतात. जसे कि काही जण त्यांच्या वेबसाईट किंवा ब्लॉग वर promot करतात. 

२. अफिलिएट्स मार्केटप्लेस ( Affiliates Marketplace) –

काही कंपनी आहेत ज्या अफिलिएट प्रोग्रॅम ऑफर करतात. त्यांना अफिलिएटस मार्केटप्लेस म्हंटले जाते.पण सर्वच कंपनी सुरक्षित आहेत कि नाही याची खात्री आपण करून घेतली पाहिजे.त्यात काही विश्वासू आणि खात्रीशीर कंपनीची नांवे खालीलप्रमाणे आहेत.

  1. Amazon
  2. Flipkart
  3. Hostinger
  4. Godaddy
  5. Udemy
  6. Razerpay
  7. SiteGround

३. अफिलिएट ID ( Affiliate ID ) –

अफिलिएट प्रोग्रॅमला जॉईन झाल्यांनतर तुम्हला एक id दिला जातो. विक्री मध्ये तुम्हला माहिती जोडण्याचे काम करतो. या iD मुळे तुम्ही तुमचे अफिलिएट अकाउंट लॉग इन करू शकता.

. अफिलिएट लिंक ( Affiliate Link) –

उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अफिलिएट कंपन्यांनी दिलेली लिंक म्हणतात. या लिंक्स वर क्लिक करून लोक उत्पादनाच्या लिंक वर पोहोचतात आणि तिथून ते खरेदी करू शकतात. लोकांना खरेदी साठी ह्या लिंक्स अफिलिएट्स त्यांच्या social मीडिया च्या अकाउंट वर पोस्ट करतात.जेणे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. बराच वेळेला लिंक खूप लांब असतात.यासाठी URL शोर्टनर वापरून लिंक लहान केल्या जातात त्याला लिंक क्लाकिंग म्हणतात.

. कमिशन ( Commission ) –

अफिलिएट्स त्यांच्या social मीडिया अकाउंट वर लिंक लावून प्रॉडक्ट्स ची यशस्वीपने विक्री केल्यांनतर कंपनी त्यांना कमिशन देते. प्रत्येक प्रॉडक्टच कमिशन वेगळं असत. ते कंपनीच्या नियम आणि अटीमध्ये अधिक नमूद केलेलं असत. त्यामुळे प्रोडुकॅटच्या किमतीवर ठरलेल्या टक्केवारी वर कमिशन मिळते.

. पेमेंट मोड ( Payment Mode ) –

अफिलिएट प्रोग्रॅममधून मिळाले कमिशन हे आपल्या बँक अकाउंट मध्ये येण्यासाठी वेग वेगळ्या mode कंपनी आपल्याला ऑफर करत असते. उदा. Paypal , UPI , Bamk transfer. काही अफिलिएट कंपनी किमान विक्री झाल्यांनतर कमिशन देते. याला पेमेंट थ्रेथ्रोल्ड असे म्हणतात.

अफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे ? 

  •  जर तुम्हाला अफिलिएट  मार्केटिंग चालू करायचे आहे तर तुम्हाला एक website बनवावी लागेल . किंवा तुमच्याकडे इंस्टाग्राम किंवा फेसबुक , सोशल मिडिया याचे अकॉउंट असले पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचे follower असले पाहिजे . ज्याणेंकरून तुम्हाला  जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज पोहोचता येईल .
  • तुम्ही अफिलिएट  प्रोग्रॅम जॉईन केल्यानंतर तुम्हाला ज्या प्रॉडक्ट चे अफिलिएट  मार्केटिंग करायचे आहे त्याची लिंक तुम्हाला मिळेल , ती लिंक तुमच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करायची .
  • ३ लिंक शेअर करताना प्रॉडक्ट बद्दल  माहिती, प्रॉडक्ट ची इमेज  आणि प्रॉडक्ट ची लिंक शेअर करायची . एकदा का पोस्ट करून झालं कि लोक तुमची पोस्ट पाहतील . ज्या लोकांना प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्ट असेल ते लोक खरेदी करतील आणि त्यातून तुम्हाला कमिशन मिळेल .
  • ४ – मित्रांनो जर तुमचा Youtube channel असेल आणि तुमचे Subscribers जास्त असतील  तर तुम्ही प्रॉडक्ट बद्दल माहिती देऊन ग्राहकांना खरेदी करण्यास आवाहन करू शकता . जेव्हा तुमच्या चॅनेल वर ट्रॅफिक यायला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला खूप फायदा होईल . मित्रांनो तुम्ही विडिओ पोस्ट करण्याआधी तुमच्या डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये  प्रॉडक्ट ची माहिती व्यवस्थित भरा.
  • ५ – मित्रांनो तुम्हाला जर चांगले पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला मेहनत सुद्धा तेव्हडीच करावी लागणार आहे सुरुवातीला . तुम्ही आज काम केले आणि लगेच तुम्हाला पैसे मिळतील असे अजिबात होत नाही त्यासाठी संयम ठेवावा लागतो आणि त्या कमला तेव्हडा वेळ देणे गरजेचे आहे .
  • मित्रांनो हे सगळं करत असताना तुम्ही हे काम सातत्याने करणे गरजेचे आहे . तुम्ही आज काम केलं आणि तुम्हाला लगेच पैसे मिळतील असं अजीबात होत नाही , तुमच्या कामामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे .

Affiliate  मार्केटिंग बुक्स –

1.Affiliate Marketing – check Price 

2.Affiliate Marketing Blueprint- Check Price

3.Affiliate Marketing for Beginners-Check Price

4.डिजिटल मार्केटिंग से सीखो और कमाओ (hindi) Check price 

5.एफिलिएट मार्केटिंग A- Z ( Hindi)-check price

6.The Ultimate Guide to Affiliate Marketing in Marathi-Check Price

FAQ –

१ –  पैसे नसताना अफिलिएट  मार्केटिंग कसे सुरू करावे ? How to Start Affiliate Marketing With No Money in 2023

  • मित्रांनो अफिलिएट  प्रोग्रॅम जॉईन करण्यासाठी पैसे लागत नाही , यामध्ये तुम्हाला फक्त मेहनत घायची तयारी पाहिजे , हे काम करताना तुम्हाला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे त्यांनतर तुम्ही यश मिळवू शकता .

२ –  अफिलिएट  मार्केटिंग करायला कठीण आहे का ? Is affiliate marketing hard for beginners?

  • मित्रांनो अफिलिएट  मार्केटिंग करायला अवघड नाहीये फक्त तुम्ही जास्तीत जास्त वेळ तिथे दिला पाहिजे . तुम्हाला एकदा सगळं माहिती झालं कि अवघड नाही , जास्तीत जास्त लोकांपर्यंत कस पोचायचं याचा प्रयत्न करत राहा .

निष्कर्ष –

मित्रांनो आपण Affiliate Marketing Marathi या बद्दल आज आपण माहिती पाहिली. सध्याच्या काळात स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे . मित्रांनो Affiliate Marketing करताना तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे तसेच तुम्हाला वेळ द्यावा लागेल . एकदा का कामाची पद्धत तुमच्या लक्षात अली कि मग तुम्हाला काम करायला देखील सोपं जाईल . तुम्ही जो कोणता टॉपिक निवडला असेल त्यावर जास्तीत जास्त माहिती घेऊन मेहनत करा , यश तुम्हाला लवकरच मिळून जाईल .

मित्रांनो खाली दिलेले लेख देखील वाचा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल .

How to Earn Money from Facebook in Marathi | फेसबुक वरून पैसे कसे कमवायचे

यूट्यूब वरून पैसे कसे कमवायचे ? || How To Earn Money From YouTube in Marathi

Instagram Marketing Marathi| इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?

Leave a Comment